Richa Chadha And Ali Fazal  
मनोरंजन

Richa Chadha : 'प्रोटिन शेक पिणारा नवरा नको होता! मला तर...'

मी जेव्हा अलीला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो मला खूपच भावला. गरीब वाटला.

सकाळ डिजिटल टीम

Richa Chadha And Ali Fazal : बॉलीवूडमध्ये आपल्या परखड स्वभावानं नेहमीच नेटकऱ्यांना नाकीनऊ आणणाऱ्या रिचानं गेल्या काही वर्षांपासून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमधील टीपिकल अभिनेत्रींपेक्षा तिनं तिची वेगळी वाट तयार करुन आपल्या अभियनाची ताकद चाहत्यांना दाखवून दिली आहे.

रिचानं गेल्या वर्षी अली फझलशी लग्न केलं. त्या लग्नाची खूप चर्चाही झाली. बऱ्याच वर्षांपासून हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांना डेट करत होते. अखेर ते विवाहबंधनात अडकले. रिचाला या लग्नावरुन सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. त्यांचा धर्म लग्नाच्या आड येत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे होते. पण ऐकेल ती रिचा कसली. तिनं बिनधास्तपणे तिची भूमिका मांडत आपल्याला जे योग्य वाटतं ते केलं.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

एका मुलाखतीमध्ये रिचानं अली फजलसोबतच्या पहिल्या मुलाखतीविषयी सांगितले. त्यामध्ये ती म्हणते, एका कास्टिंग दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये माझी आणि अलीची ओळख झाली होती. येत्या ४ ऑक्टोबर रोजी अली आणि रिचाच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण होणार आहे. लग्नानंतर रिचानं मुंबईमध्ये एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. त्यावेळी तिनं काही जणांना सांगितले की, आपल्याला प्रोटीन शेक पिणारा नवरा नको होता. जीममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंग करणाऱ्या मुलापेक्षा वैचारिकता असणारं व्यक्तिमत्व मला जास्त महत्वाचे वाटते.

मी जेव्हा अलीला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो मला खूपच भावला. गरीब वाटला. त्याच्याशी बोलल्यावर त्याची वैचारिका मला प्रभावित करुन गेली. प्रत्येक बाबत त्याला स्वताची भूमिका आहे हे पाहून मला आनंद झाला होता. केवळ जीममध्ये जाऊन प्रोटीन शेक घेऊन स्वताला सिद्ध करणाऱ्यांपैकी तो एक नव्हता हे मला जाणीवपूर्वक सांगावे लागेल. ज्यावेळी त्याला त्या कास्टिंग दिग्दर्शकाच्या कार्यालयात भेटले तेव्हापासून त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण झाले.

अजूनही मला अलीची ती भेट लक्षात आहे. खूपच केअरिंग करणारा वाटला. त्याचे प्रेमळ बोलणे आठवते. मुळात तो खूपच संवेदनशील आहे. जसे त्याला डेट केले त्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्याचे रिचानं यावेळी सांगितले. अली आणि माझ्यातील आवडी निवडी बऱ्याच अंशी सारख्या आहेत. ज्यात फरक आहे त्याविषयी आमच्यापैकी कुणी एक जण अडजस्ट करतो. त्याचा आम्हाला फायदाच होतो. वाद होत नाहीत.

रिचाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती हिरामंडी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळई दिग्दर्शित करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. एका सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

Stray Dog Killing Telangana : धक्कादायक घटना ! तीन दिवसांत ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या, सरपंच अन् ग्रामसचिवाने लावली विल्हेवाट

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

SCROLL FOR NEXT