Narendra Modi - Ricky Kej 
मनोरंजन

ग्रॅमी पुरस्कार विजेत्या रिकी केजने भारताला दिलं राष्ट्रगीताचं नवं व्हर्जन; मोदींनीही केलं कौतुक

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केजचं भारतात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. रिकी यांनी असं काही केलं की सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटत आहे. त्यांच्या कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आनंदीत झाले आहेत.

रिकीने स्वतंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी अर्थात 14 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने 100 ब्रिटीश रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रासह संगीतबद्ध केलेले भारतीय राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन सादर केले होते. त्याच्या या कलाकृतीचे कौतुक करताना पीएम मोदींनी ट्विटर म्हटलं की, 'अद्भुत, यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

रिकी केजने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी 60 सेकंदाचा व्हिडिओ भेट दिला. त्याने लंडनमधील प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये जगातील सर्वात मोठ्या सिम्फनी ऑर्केस्ट्राद्वारे रेकॉर्ड केलेले, भारतीय राष्ट्रगीत स्वातंत्र्यदिना निमित्ताने शेअर केलं.

केजने व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, 'काही दिवसांपूर्वी, मी लंडनच्या प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये भारताचे राष्ट्रगीत सादर करण्यासाठी 100 जणांच्या ब्रिटिश ऑर्केस्ट्रा, द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. भारताचे राष्ट्रगीत रेकॉर्ड करणारा हा सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा होता.

शेवटच्या 'जय हे...' ने माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले होते. भारतीय संगीतकार असल्याचा आनंद होतो. या स्वातंत्र्यदिनी मी हे ऐतिहासिक रेकॉर्डिंग तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आदराने वापरा, शेअर करा आणि पहा. ते आता तुमचे आहे. जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT