Rinku Rajguru had to cancel the shooting of makeup because of fans 
मनोरंजन

रिंकूला पाहण्यासाठी जमा झालं गावं अन् पुढे झालं असं...

वृत्तसंस्था

पुणे : रिंकू हे नाव सध्या चांगलचं चर्चेत आहे. 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'मेकअप' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. पुण्यातल्या खराडीमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. पण, तिथे रिंकू येणार असल्याची माहिती गावात पसरली आणि पुढे...बघा काय झालं. 

गेल्या काही दिवसांपासून 'सैराट' ची आर्ची चर्चेत आहे. तिचा आगामी सिनेमा 'मेकअप' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याचं जोरदार प्रमोशन करताना रिंकू दिसत आहे. हा चित्रपट रिंकूसाठी नक्कीच खास असणार आहे. यामध्ये तिचा एक नाही तर चक्क दोन वेगळ्या रोलमध्ये दिसणार आहे. खराडीमध्ये चित्रीकरण सुरु असताना तिथे रिंकू स्वत: तिथे येणार असल्याची माहिती गावात पसरली. 

रिंकूला पाहण्यासाठी तिथे अख्खा गाव जमा झाला. या जमावामुळे चित्रीकरण करण्यात अडचणी येत होत्या. अखेर हे तिथलं चित्रीकरण रद्द करण्याची वेळ आली. या प्रसंगाविषयी बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक गणेश पंडित म्हणाले, "रिंकू गावात चित्रीकरणासाठी येणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना मिळाली आणि त्यांनी ते थेट शुटिंगच्या ठिकाणी पोहोचले. रिंकूसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरु होती. सिनेमाचं शुटिंग झालं नाही मात्र चाहत्यांनी आपल्या फोनमध्ये रिंकूची झलक टिपण्यासाठी चित्रीकरण सुरु केलं. एकंदरीत तिथे गोंधळ हा सुरु होता आणि आमच्या टीममधील सदस्यांचा ही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही सुरु होता. मात्र गर्दी जास्त असल्याने तेही असफल ठरले. अखेर शुटिंग रद्द करुन रिंकूला हॉटेलवर नेण्याचा आम्ही निर्णय घेतला. पण, तिथेही परिस्थिती तशीच होती.  हॉटेलबाहेरही चाहत्यांची गर्दी रिंकूच्या प्रतीक्षेत पोहोचली होती. रात्रभर ही गर्दी तशीच उभी होती. मात्र रोजरोज चित्रीकरण थांबवणे शक्य नसल्याने अखेर दुसऱ्या दिवशी योग्य खबरदारी घेऊन आम्ही चित्रीकरण सुरळीत पार पाडले.''

रिंकूचा 'मेकअप' दोन दिवसांनी म्हणजेच 7 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. 
'मेकअप' चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT