rinku rajguru parents in film ek maratha lakh maratha esakal news 
मनोरंजन

आर्चीच्या आई बाबांनाही पडली सिनेमाची भूरळ!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातील आपल्या भूमिकेने सगळ्यांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण ही बातमी खरी आहे. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.२४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचे रुपांतर मोठ्या जनआंदोलनात होते. मात्र हे झालेले रुपांतर त्याला कळत नाही. त्याच्या समोर केवळ एकच लक्ष्य असते, आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे.

‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन साताऱ्याच्या गणेश शिंदे यांनी  त्यांच्या साई सिने फिल्म्स निर्मितीसंस्थे अंतर्गत केले आहे. अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT