Rinku rajguru reaction on night life in mumbai  
मनोरंजन

रिंकू म्हणते, हे नाइट लाइफ काय असतं ?

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'सैराट' ची आर्ची चर्चेत आहे. तिचा आगामी सिनेमा 'मेकअप' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याचं जोरदार प्रमोशन करताना रिंकू दिसत आहे. हा चित्रपट रिंकूसाठी नक्कीच खास असणार आहे. यामध्ये तिचा एक नाही तर चक्क दोन वेगळ्या रोलमध्ये दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिंकू अनेक मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिंकूला तरुणांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रिंकूने नक्की काय उत्तर दिलं वाचा. 

'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही दिवासांपूर्वी तीने 'धडक' फेम जान्हवी कपूरची भेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरली. गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'मेकअप' सिनेमाची चर्चा पाहायला मिळतेय. 

नुकताच मुंबईत 27 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता मुंबईच्या मरीन ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ अशा काही परिसरात नाइट लाइफ सुरु करण्यात आली आहे. या नाइट लाइफच्या मुद्द्याला अनेकांनी विरोध केला तर काहींनी समर्थनही केले. याचसंबंधी रिंकूलाही एका पत्रकाराने प्रश्न विचारला. नाइट लाइफविषयी प्रश्न विचारल्यावर रिंकू म्हणाली, ''नाइट लाइफ काय असतं हेच मला माहित नाही त्यामुळे त्यावर मतही व्यक्त करु शकत नाही''.

तिच्या या उत्तरावर सर्वांनाच आश्चर्च वाटले. पण, तिचा निरागसपणाही त्यातून समोर आला आहे. रिंकू एका छोट्या गावातून पुढे आली आहे. सेलिब्रिटी असूनही ती अजुनही साधी मुलगीच आहे. त्यामुळे तिला नाइट लाइफविषयी माहित नाही. 

'मेकअप' चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT