Rinku Rajguru shared Make up movie trailer on Instagram  
मनोरंजन

MakeUp Poster : 'आर्ची' आता होणारे 'पूर्वी'! तिचा 'मेकअप' बघाच...

सकाळ डिजिटल टीम

'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाचा पोस्टर तिने इन्स्टाग्रामला शेअर केलाय.

रिंकूच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मेकअप' असून काही दिवसांपूर्वी त्याचा टिझर प्रदर्शित झाला होता. नेटकऱ्य़ांमध्ये या टिझरची खूप चर्चा झाली. रिंकूसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीकर झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रिंकू दोन अगदी वेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. साध्या मुलीमधला तिचा रोल आणि मग मॉर्डन रिंकूच्या लुकने सिनेमामध्ये ट्विस्ट आणला आहे. हा चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे.

रिंकूची एक वेगळी झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये इतर कलाकार कोण असणार आहेत आणि रिंकूचा 'मेकअप' कशासाठी आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ट्रेलरसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे.

काही दिवसांपूर्वी रिंकूने जान्हवी कपूरसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर या दोघी एकत्र काम करताना दिसणार आहेत अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT