Rinku rajguru upcoming movie teaser released  
मनोरंजन

रिंकूचा नवा 'मेकअप', टिझर एकदा बघाच !

वृत्तसंस्था

मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही दिवासांपूर्वी तीने 'धडक' फेम जान्हवी कपूरची भेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रिंकूच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मेकअप' असून त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्य़ांमध्ये या टिझरची चर्चा असून तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. रिंकूसोबत य़ा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीकर झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रिंकू दोन अगदी वेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. साध्या मुलीमधला तिचा रोल आणि मग मॉर्डन रिंकूच्या लुकने सिनेमामध्ये ट्विस्ट आणला आहे. हा चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे. 

रिंकूची एक वेगळी झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये इतर कलाकार कोण असणार आहेत आणि रिंकूचा 'मेकअप' कशासाठी आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ट्रेलरसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. '100' असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी रिंकूने जान्हवी कपूरसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर या दोघी एकत्र काम करताना दिसणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT