Rishabh Pant Trolled Hansal Mehta Esakal
मनोरंजन

Rishabh Pant Trolled: 'हा तर शास्त्रीय संगीताचा अपमान!' ऋषभच्या जाहिरातीवर हंसल मेहता भडकले..

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटपटू ऋषभ पंत हा त्याच्या ड्रीम 11 च्या नवीन जाहिरातीमूळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांची ही जाहिरात अनेकांना आवडलेली नाही. त्यामूळे आता नवीन वाद तयार होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता अनेकदा सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतात. चित्रपट बनवण्यासोबतच ते अनेक मुद्द्यांवर ठामपणे बोलतात.

अलीकडेच हंसल मेहताने ड्रीम 11 च्या नवीन जाहिरातीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला चांगलाच झापलं आहे. या जाहिरातीत ऋषभ शास्त्रीय संगीतात आपला हात आजमावत आहे आणि कलाप्रकाराच्या नावावर विनोद करत आहे. हंसल यांनी याला 'घृणास्पद आणि अपमानजनक' म्हटलं आहे.

अलीकडेच हंसल मेहताने ड्रीम 11 च्या नवीन जाहिरातीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला चांगलाच झापलं आहे. हंसल मेहता यांनी या बद्दल एक ट्विटमध्ये लिहिले की, 'हे घृणास्पद आणि अपमानास्पद आहे. स्वत: ला दलाल करा पण कला आणि तिच्या समृद्ध परंपरांची थट्टा करू नका. @Dream11 ने ते परत घ्यावं' अशी माझी मागणी आहे.

या जाहिरातीत ऋषभ पंत हा विचार करत आहे की तो क्रिकेटर नसता तर तो कसा असता. त्यानंतर ऋषभचा शास्त्रीय गायक म्हणून एक सीन येतो. मात्र, तो माइकसमोर विकेटकीपरची भूमिका घेतो आणि खराब गातो. बऱ्याच दिवसांपासून ही जाहिरात टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. याआधी कौशिकी चक्रवर्ती यांनीही ऋषभवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘बंडखोर फॅक्टर’! महायुती–महाविकासच्या रणनीतींना धक्का; सत्ता समीकरण बदलणार, किती उमेदवार मैदानात?

Latest Marathi News Live Update : नोटाचा अभ्यास आधी करा, पळून गेलेल्या उमेदवारांना जाब विचारा: दीपेश म्हात्रेंचा जोरदार पलटवार

Municipal Election: भिवंडी-निजामपूर पालिकेत सत्तासमीकरण बदलले! सपा गड ढासळला; काँग्रेस-भाजप-शिवसेनेची पकड मजबूत

Ravindra Chavan : "एबी फॉर्म वाटपातील चुकांची जबाबदारी माझीच"; नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची कबुली

BMC Election: सर्वाधिक बंडखोर भाजप- ठाकरे गटात; १३ ठिकाणी मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT