Rishi Kapoor & Neetu Kapoor Instagram
मनोरंजन

The Romantics: 'सेक्सनंतर..','द रोमॅंटिक्स' सीरिजमध्ये हे काय बोलून गेलेयत ऋषी कपूर,नीतू कपूरही लाजून लाल

नेटफ्लिक्सवर 'द रोमॅंंटिक्स' डॉक्युमेन्ट्री सीरिज रीलिज झाली आहे, त्यातील Rishi Kapoor यांची बिनधास्त विधानं सध्या भलतीच गाजतायत.

प्रणाली मोरे

Rishi Kapoor: नेटफ्लिक्सवर १४ फेब्रुवारीला 'द रोमॅंटिक्स' ही डॉक्युमेन्ट्री सीरिज रिलीज झाली आहे,यामध्ये Rishi Kapoor यांचं स्टेटमेंट चर्चेत आलं आहे. ४ भागात बनलेली ही डॉक्युमेन्ट्री यश चोप्रा आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला समर्पित केली आहे.

या सीरिज मध्ये दिवंगत अभिनेता Rishi Kapoor आणि त्यांच्यासोबत पत्नी नीतू कपूरही दिसत आहेत. सीरिजमध्ये Rishi Kapoor यांनी काही मजेदार आणि बिनधास्त उत्तरं दिलेली दिसत आहेत.

आणि ही उत्तरं सिनेमा आणि बॉलीवूड संदर्भात आहेत. त्यांनी सिनेमाची तुलना सेक्ससोबत केली आहे. आणि याला एंटरटेन्मेंटचं सर्वात उत्तम माध्यम म्हटलं आहे.

सीरिजमध्ये शाहरुख खान,सलमान खान,रानी मुखर्जी यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे.(Rishi Kapoor compares cinema to sex calls its best form of entertainment)

सीरिजमध्ये माधुरी दिक्षित,आमिर खान,रणवीर सिंग,करण जोहर यांच्यासहित अनेक सेलिबनी त्यांनी पहिल्यांदा यश चोप्रा यांचा सिनेमा पाहिला तेव्हा त्यांना तो कसा वाटला तसंच लहानपणी त्यांच्यासाठी सिनेमाप्रती प्रेम म्हणजे नेमकं काय वाटायचं यावर देखील मतं मांडली आहेत.

Rishi Kapoor सुरुवातीला नीतू सिंग यांच्यासोबत दिसतात. देशातील लोकांचे सिनेमाप्रती असलेलं वेड याच्यावर ते बोलताना दिसतात.

Rishi Kapoor म्हणतात की, ''आपल्या देशात सिनेमा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य लोक आपल्या भारतीय सिनेमाला पाहतात,आता हा देश फक्त साधू-संतांचा नाही, ना साप-सफेऱ्यांचा..हत्तीचा ना धावणाऱ्या गाई-म्हशींचा...आपण खूप मोठा प्रवास करत पुढे निघून आलोय''.

यानंतर Rishi Kapoor बोलतात की, ''सेक्सनंतर जगात सिनेमाच एंटरटेन्मेंटचं उत्तम साधन आहे. मला वाटतं भारतीयांच्या बाबतीत तरी असंच असावं''.

Rishi Kapoor यांनी खूप सहजपणे ही गोष्ट सांगितली. यावर नीतू कपूरही लाजताना आणि हसताना दिसल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT