Raj kapoor & Rishi Kapoor Instagram
मनोरंजन

Raj Kapoor Birthday: वडिलांच्या अफेअर संदर्भात ऋषि कपूरने केलेला शॉकिंग खुलासा.. म्हणालेले,'वैयजंतीमालांमुळे तेव्हा..'

२०१७ झाली प्रकाशित झालेल्या ऋषि कपूर यांच्या 'खुल्लम खुल्ला' पुस्तकात त्यांनी आपले वडील राज कपूर यांच्या अफेअर्स संदर्भात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Raj Kapoor Birthday: आज राज कपूर यांची जयंती. राज कपूर यांच्याबद्दल ऋषि कपूर यांनी पुस्तक 'खुल्लम खुल्ला' २०१७ मध्ये एक खास किस्सा शेअर केला होता.

'खुल्लम खुल्ला' मध्ये ऋषि कपूर यांनी आपले वडील राज कपूर यांच्या विवाहबाह्य संबधांपासून ते नीतू कपूर यांना वाईट वागणूक देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. चला पुस्तकातील एक किस्सा जाणून घेऊया.

त्या काळातील सिनेप्रेमींना राज कपूर यांच्या अफेअर्सविषयी खूप चांगलं माहित आहे. आजही त्या कहाण्या तितक्याच चर्चेत आहे. ऋषि कपूर यांनी देखील आपल्या पुस्तकात याविषयी लिहिले होते.

त्यांनी कोणताही संदेह न ठेवता लिहिलं होतं की आपली आई कृष्णा हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही वडीलांचे विवाहबाह्य संबंध होते.(Rishi Kapoor openly wrote on father raj kapoor's extra marital affairs)

ऋषि कपूर यांनी लिहिले होते की, जेव्हा त्यांचे वडीलांचे नर्गिस यांच्यासोबत अफेअर झालं तेव्हा ते खूप छोटे होते,त्यामुळे त्यांना यानं फार फरक पडत नव्हता. पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं की वडीलांच्या या अफेअर्सचा आमच्या घरातील वातावरणावर कधी परिणाम झालेला मला आठवतही नाही.

पण जेव्हा माझ्या वडीलांचे वैयजंतीमाला सोबत अफेअर झालं तेव्हा त्याच्या खूप वाईट आठवणी आपल्या सोबत राहिल्या असंही ऋषि कपूर यांनी लिहिलं आहे.

ऋषि कपूर यांनी पुस्तकात लिहिलं होतं की जेव्हा वैजयंतीमाला सोबत त्यांच्या वडीलांचे अफेअर झाले तेव्हा आई मरीन ड्राइव्ह येथील नटराज हॉस्पिटलमध्ये रहायला गेली होती. त्यानंतर हॉटेलनंतर आम्ही २ महिने चित्रकूट अपार्टमेंटमध्ये राहिलो होतो. राज कपूर यांनी आपली पत्नी कृष्णा हिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्यासाठी वेगळ्या अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केलं पण आई तोपर्यंत ऐकली नाही जोपर्यंत वडलांनी त्यांच्या आयुष्यातील वैयजंचीमाला हे चॅप्टर बंद केलं नाही.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

अर्थात वैयजंतीमाला यांनी आपल्या Bonding..A Memoir पुस्तकात लिहिलं होतं की राज कपूर यांच्यासोबत त्यांचे अफेअर कधी नव्हते. त्यांनी फक्त हे सगळं पब्लिसिटीसाठी केलं होतं. यावर ऋषि कपूर खूप नाराज झाले होते.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की आता त्यांचे वडील यावर बोलायला हयात नाहीत तेव्हा वैयजंतीमाला यांना त्यांना खोटं ठरवायचा काहीच अधिकार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT