riteish deshmukh comment on wife genelia deshmukh pregnancy rumours SAKAL
मनोरंजन

Genelia Deshmukh: मला दोन - तीन मुलं अजुन चालतील पण... जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेशने सोडलं मौन

बायको जिनिलीया खरंच गरोदर आहे का? रितेश म्हणाला

Devendra Jadhav

Genelia Deshmukh Pregnancy News: गेल्या काही दिवसांपासुन जिनिलीया देशमुख गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एका इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश सहभागी झाले होते. त्यावेळी जिनिलीयाकडे बघून अनेकांनी ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु केल्या.

जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली. बायको गरोदर असल्याच्या या सर्व चर्चांवर रितेशने अखेर मौन सोडलं आहे.

(riteish deshmukh comment on wife genelia deshmukh pregnancy)

जिनिलीया खरंच गरोदर आहे का? रितेश लिहीतो...

गेल्या काही दिवसांपासुन जिनिलीया देशमुख गरोदर असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. अखेर या सर्व प्रकरणावर रितेशने मौन सोडलंय.

रितेश म्हणतो, "अजुन २ - ३ मुलं असली तरी मला काही हरकत नाही, पण दुर्देवाने या बातमीत काही तथ्य नाही."

अशाप्रकारे रितेशने जिनिलीया गरोदर नाही, हे स्पष्ट केलंय.

का सुरु झाली जिनिलीया गरोदर असल्याची चर्चा?

गेल्या २ - ३ दिवसांपासुन जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्युज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश या दोघांचा फोटो बातमीचा विषय झाला आहे. या दोघांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण आता रितेशने स्पष्टच सांगुन या सर्व अफवा असल्याचं सांगितलंय.

रितेश - जिनिलीयाचं सर्वांना वेड

बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रितेश आणि जिनिलीयाकडे पाहिले जाते. २ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान, त्यानंतर २०१६ मध्ये जेनेलिया दुसऱ्यांदा आई झाली.

या वर्षी रितेश - जिनिलीयाचा वेड सिनेमा खूप गाजला. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. रितेश - जिनिलीयाला पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT