मनोरंजन

'माऊली' आला; ट्रेलर प्रदर्शित (व्हिडीओ)

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. टीझर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सलमान खाननेही फेसबुकवरून शेअर केला आहे. जवळपास पावणेतीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद दाखवण्यात आले आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

'तसे तर निम्मे आपल्या एण्ट्रीलाच पळून जातात पण आता समधे थांबलाच आहात तर माऊली नाराज नाय करणार'; या संवादाने रितेशची धमाकेदार एण्ट्री दाखवण्यात आली आहे. या एण्ट्रीसोबतच जबरदस्त अॅक्शन सीन दाखवण्यात आला आहे. चित्रपटात रितेशने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर, सिद्धार्थ जाधव पोलिस हवालदाराच्या भुमिकेत दिसत आहे. तर, जितेंद्र जोशीने खलनायकाची भूमीका साकारली आहे.

14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'हिंदुस्तान टॉकीज'च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. या चित्रपटाची निर्मीती रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT