Riteish Deshmukh 
मनोरंजन

Riteish Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखला अश्रू अनावर; मोठ्या भावाने येऊन सावरलं, आईच्या डोळ्यातही अश्रू

Riteish Deshmukh: भाषणात विलासराव देशमुख यांच्या आठवणींना रितेशनं उजाळा दिला.

priyanka kulkarni

Riteish Deshmukh: आज लातुरमध्ये विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला देशमुख कुटुंबानं हजेरी लावली. तसेच यावेळी लातुरातील काँग्रेसचे बडे नेते देखील या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानं भाषण केलं. भाषणात विलासराव देशमुख यांच्या आठवणींना रितेशनं उजाळा दिला. यावेळी रितेश हा विलासराव देशमुखांच्या आठवणीत भावूक झाला. रितेशचे मोठे भाऊ अमित देशमुख यांनी रितेशला यावेळी सावरलं.

काय म्हणाला रितेश?

लातुरमध्ये केलेल्या भाषणात रितेश म्हणाला, "आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो? हिच भावना विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख यांची होती. साहेबांना जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आम्हाला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना मला हे सांगता आलं नाही, पण मी आज सर्वांसमोर त्यांना सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, त्याचे ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर तुम्ही पाहू शकता."

रितेश भाषणादरम्यान भावूक झालेला दिसला. तसेच रितेशची आई वैशाली देशमुख या देखील भावूक झाल्या. भाषण करत असताना रितेशच्या डोळ्यात अश्रू आले, यावेळी अमित देशमुख यांनी रितेशला धीर दिला.

रितेशचे चित्रपट

रितेशनं हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. रितेशच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 2022 मध्ये रितेशचा वेड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT