Riteish Deshmukh Google
मनोरंजन

Valentine Day: प्रेमवीरांनो रितेशने दिलेला सल्ला ऐकाल तर वाचाल!

अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर भलताच अॅक्टिव्ह असतो. अर्थात सध्या तो आपल्या आगामी 'वेड' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. त्यातच त्याचा आणि जेनेलियाचा खूप दिवसांनी एकत्र असा 'मिस्टर.मम्मी' हा भन्नाट सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमासंदर्भात त्याने अन् जेनेलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनी त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्सुकता वाढली आहे. तर आपण बोलत होतो रितेशच्या सोशल मीडियावरील सक्रियतेविषयी. तो नेहमी एखादा विषय घेऊन व्हिडीओ बनवतो. त्यामुळे अर्थातच त्यातला केवळ विनोदी कन्टेन्ट नाही तर रितेशच्या विनोदी अभिनयातील सहजता व्हिडीओ पाहणाऱ्याला खळखळून हसायला भाग पाडते हे मात्र नक्की. आता रितेशनं आणखी एक व्हिडीओ 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्तानं शेअर केला आहे.

रितेशनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओत तो एका स्टॅच्युजवळ उभा आहे. हा व्हिडीओ त्यानं खास '१४ फेब्रुवारी' म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं बनवला आहे, हे व्हिडीओतील त्याच्या संवादावरुन लक्षात येत आहे. यात रितेश म्हणतो कसा,''१४ फेब्रुवारीपर्यंत जर तुमचं कुणाशी सेटिंग झालं नाही तर समजा तुमचा जन्म केवळ जनगणनेसाठी झालेला आहे''...त्याच्या या व्हिडीओवर चाहते जाम खूश झालेले दिसून आलेयत ते त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून लक्षात येते. या व्हिडीओच्या निमित्तानं रितेशने त्या हजारो-लाखो प्रेमवीरांची समजूत काढायचा प्रयत्न केलेला दिसत आहे. रितेश विनोदी अभिनेता म्हणून अव्वल आहेच हे अनेकदा त्याच्या सिनेमांच्याच नाही तर अशा व्हिडीओ रीलच्या माध्यमातूनही सिद्ध होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT