Riteish Deshmukh, Genelia D'souza-deshmukh Google
मनोरंजन

रितेश-जेनेलियाच्या घरी पुन्हा पाळणा हलणार?

अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करून दिली यामागची नेमकी माहिती

प्रणाली मोरे

लग्नानंतर जेनेलियाने( Genelia D'souza) अभिनेत्री म्हणून बॉलीवूडला तसा रामराम ठोकला होता. नवरा रितेशच्या (Riteish Deshmukh) प्रॉडक्शन हाऊसची धुरा मात्र ती निर्माती बनून सांभाळताना दिसली. म्हणजे तिनं पूर्णतः सिनेसृष्टीला गूडबाय केला नव्हता. या दोघांची जशी ऑफ स्क्रीन केमिस्ट्री भन्नाट आहे तशीच ऑन स्क्रीनही मोठ्या पडद्यावर त्यांना दंगा करताना आपण पाहिलंच आहे. त्यांनी एकत्र केलेले सिनेमे अगदी ब्लॉकबस्टर ठरले नसले तरी त्यांच्या जोडीला एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांनी नेहमीच एन्जॉय केलं आहे. आता पुन्हा हे दोघे 'मिस्टर मम्मी' या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर धम्माल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन शाद अली करणार आहे तर निर्माता म्हणून भूषण कुमार,कृष्ण कुमार,शाद अली आणि सिवा अनंथ यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Mister Mummy FIRST LOOK: Riteish Deshmukh and Genelia with their pregnant bellies

काही दिवसांपूर्वीच जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करून अनाऊन्समेंट केली होती. आता रितेश-जनेलिया आणि विनोदी कथा म्हटल्यावर नुसता दंगा असणार यात शंकाच नाहीत. तिनं त्या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं होतं की, ''तयार रहा एका लाफ्टर राइडमध्ये बसण्यासाठी. ती राइड करताना हसून हसून पोटात गुदगुल्या झाल्या नाहीत तर नवल. तुमच्या मनाला द्या एक सुंदर हास्यानुभव. याआधी कधीही न अनुभवलेला''. अशा अर्थाचं एकंदरीत ते कॅप्शन होतं.

या सिनेमाची कथा एका विवाहीत जोडप्याची आहे. पालकत्व स्विकारण्यावरुन त्यांचे असलेले वेगवेगळे विचार विनोदी माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत. पण त्यांच्या भविष्यात काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. या विनोदी ड्रामामधून एक सुंदर कथानक गुंफलं आहे, ज्यातनं नात्यातील गोडव्याचा एक नवा पैलूही समोर येईल. नुकतेच रितेश आणि जेनेलियाने आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला. तेव्हा रितेशने जेनेलियासाठी 'आय लव्ह यू बायको' म्हणत लिहिलेली पोस्ट खूप रोमॅंटिक होती. या पोस्टमध्ये त्याने जेनेलियानं आतापर्यंतच्या आयुष्यातील चढ-उतारात मोलाची साथ दिली याबद्दल तिच्यासाठी प्रेम व्यक्त केले आहे. असो,आता या दोघांचा कॉमेडी सिनेमा म्हणजे रसिकांसाठी मनोरंजनाची चविष्ट मेजवानी असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT