Nagraj Manjule, Ritesh Deshmukh Google
मनोरंजन

Jhund: 'नागराज मंजुळे वेदना देतो.....' रितेश देशमुख झाला व्यक्त

'झुंड' सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहात पहायला जावा असं आवाहन रितेश देशमुखने केलं आहे.

प्रणाली मोरे

नागराज मंजुळे(Nagraj Manjule)च्या 'झुंड'(Jhund) सिनेमाला समिक्षकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी पसंतीची पोचपावती दिली आहे. परफेक्शनीस्ट आमिर खान तर सिनेमा पाहिल्यानंतर इतका भारावून गेला की त्यानं थेट जाहिर केलं की नागराजच्या 'झुंड' सिनेमानं माझ्या ३०-३५ वर्षाच्या कारकिर्दीला फुटबॉलसारखं भिरकावून दिलं आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतीलही अनेक कलाकारांनी नागराजच्या 'झुंड' सिनेमाचं कौतूक करताना प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. कारण समिक्षकांनी सिनेमा गौरविला असला तरी बॉक्सऑफिस कलेक्शनवर मात्र सिनेमा हवी तशी अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकलेला नाही.

अभिनेता रितेश देशमुखने नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमा पाहिल्यानंतर केलेली पोस्ट आता चर्चेत आहे. त्यानं नागराजच्या सिनेमाचं कौतूक करताना प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ''नागराजचा झुंड सिनेमा स्वतःसाठी मोठ्या पडद्यावर जाऊन पहा. त्यानं त्याच्या सिनेमाच्या माध्यमातून कधी आपल्याला रडवलं, कधी हसवलं,कधी आनंदाचे क्षण जगायला दिले तर कधी असह्य वेदनेची जाणीव करुन दिली. बुरसटलेल्या समाजव्यवस्थेच्या भिंतींनी विभागलेल्या दोन भारताची रुपं त्यानं आपल्या सिनेमातनं नेहमी आपल्याला दाखवली आहेत''. रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिनेमावर काम करीत आहेत.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा सिनेमा समाजातील व्यवस्थेवर भाष्य करतो. अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका केली आहे. विजय बारसे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. आणि प्रत्यक्ष विजय बारसे नामक फुटबॉल प्रशिक्षक यांनी झोपडपट्टीतील मुलांना एकत्रित संघटीत करुन झोपडपट्टी फुटबॉल संघ भारतभर स्थापन करण्याचं महान कार्य केलं आहे. समाजातील दुर्लक्षित घटकाला प्रवाहात आणण्याचा त्यांचा संघर्ष नागराजनं 'झुंड' या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT