Ritesh Deshmukh, Genelia Dsouza-Deshmukh Google
मनोरंजन

रितेश-जेनेलियाच्या आयुष्यात वादळाची घंटा;अभिनेत्याने स्वतः सांगितले...

सोशल मीडियावर त्याच्या 'EX' विषयी कबुली दिल्याचा व्हिडीओ समोर आला अन्..

प्रणाली मोरे

रितेश देशमुख(Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा(Genelia Dsouza) यांच्या लग्नाला आता जवळ-जवळ दहा वर्ष होऊन गेली आहेत. या दोघांचा प्रेमविवाह. अनेकदा यांची लव्हस्टोरी आपण त्यांच्या तोंडून ऐकली असेल. यांचं जुळून आलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा रितेश हा मुलगा असल्यामुळे जेनेलियाच्या हाती मोठं घबाड लागलं असं अनेकांनी बोलून दाखवलं. पण त्याही उपर जेनेलिया एका कॅथलिक कुटुंबातून येऊन मराठमोळ्या मोठ्या खानदानी कुटुंबाची सुन म्हणून ज्या पद्दतीनं समाजात वावरली किंवा वावरते ते खरंच तारिफे काबिल. लग्नाच्या इतक्या वर्षांनतरही दोघांचं मॅरिड लाइफ उत्तम सुरू आहे ते पाहून अनेकांना कदाचित हेवा वाटत असेल. जेनेलियानंही आपलं चांगलं करिअर सोडून पूर्णपेणे कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला,कमी वयातही दोन मुलांना जन्म देऊन आई होण्याची मोठी जबाबदारी स्विकारत सगळं उत्तम हॅंडल केलं. अनेकदा हे दोघे सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे,किंवा फक्त त्या दोघांचे असे फोटो,व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल सुरू आहे याचे दाखले मिळतात आपल्याला.

हाच तो व्हिडीओ जो रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पण आता रितेशने असा एक व्हिडीओ शेअर केलाय की ज्यामुळे त्याच्या मॅरिड लाइफचं होत्याचं नव्हतं व्हायची वेळ आली आहे. रितेश-जेनेलिया नेहमीच त्यांचे स्वतःचे,दोघांचे किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतात. पण आता रितेश एक घोड चूक करून बसलाय. त्यानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत त्यानं चक्क त्याच्या 'EX' विषयी भाष्य केलंय. त्याउपर त्यानं लोकांना प्रश्न केलाय की,''लोक का घाबरतात त्यांच्या एक्सविषयी भाष्य करायला?'' आता यावर जेनेलिया वहिनी भडकून काही तरी पोस्ट करणार हे ठरलं. आता प्रतिक्षा आहेच तिच्या व्हिडीओची. कारण असंच या दोघांत थोडीशी कुरबूर झाली होती जेव्हा रितेशने प्रिती झिंटाला खूप वेळ जेेनेलियाच्यासमोर मिठीत घट्ट पकडलं होतं. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला होता. असो,झालं ते का आठवायचं म्हणा. पण आता हा 'EX' विषयी बोलल्याचा व्हिडीओ पोस्ट करून रितेशने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे हे मात्र नक्की. चांगला नजर लागेल असा संसार सुरू असताना काय रितेशला हा वेडेपणा सुचला माहीत नाही. त्याला तो भारी पडू नये म्हणजे झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT