Ritesh And Genelia  esakal
मनोरंजन

Ritesh-Genelia Deshmukh: भाजपने रितेश-जेनेलियाला घेरलं, कंपनीला 116 कोटींचे कर्ज मंजूर झाले कसे?

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपनं केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ritesh Deshmukh Geneliya News: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपनं केले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना 116 कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवालही यानिमित्तानं समोर आला आहे.

रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला अवघ्या एका महिन्यात 120 कोटींचे कर्ज कसे देण्यात आले आहे. ते कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मराठी वृत्त वाहिनी एबीपी माझानं व्हायरल केलेल्या बातमीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कमी कालावधीत अवघ्या महिन्याच्या आत त्यांना कर्ज मिळाले. त्या बँकेने आतापर्यत किती जणांना कर्ज दिले? त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन व्हावेत असा प्रश्न भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

एमआयडीसीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांना जी जमिन देण्यात आली ती कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली आहे असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. यासगळ्या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

SCROLL FOR NEXT