Marriage
Marriage  sakal media
मनोरंजन

'ती माझी कायदेशीर पत्नी नाही'; अखेर रितेशची कबुली

स्वाती वेमूल

जवळपास अडीच वर्षे आपली ओळख लपवल्यानंतर, 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेश सिंग (Ritesh Singh) अखेर बिग बॉस १५मधून (Bigg Boss 15) सर्वांसमोर आला. मात्र राखी आणि रितेशच्या लग्नाविषयी अजूनही अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रितेशची पहिली पत्नी स्निग्धा प्रिया हिने त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर आता त्यांच्या लग्नावरील प्रेक्षकांना असलेला संशय आणखी बळावतोय. रितेशने आपण एनआरआय असल्याचं खोटं सांगितलं होतं, असाही आरोप त्याच्या पहिल्या पत्नीने केला आहे. राखी आणि रितेश गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात एकत्र होते. मात्र या रविवारी रितेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्याच्या लग्नाविषयी आणि पहिल्या पत्नीच्या आरोपांविषयी खुलासे केले आहेत.

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, "लग्न ही माझ्यासाठी अत्यंत खासगी बाब आहे. माझ्या पहिल्या पत्नीने माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे तिच्यासोबतचे सर्व वाद मिटवल्यानंतर मी आणि राखी कायदेशीर पद्धतीने लग्न करणार होतो. राखीच्या करिअरचासुद्धा प्रश्न होता, माझेसुद्धा अनेक प्रोजेक्ट रखडले होते. मी आणि राखी लवकरच सर्वांसमोर कायदेशीर पद्धतीने लग्न करू आणि इंडस्ट्रीतील सर्व मित्रमैत्रिणींना बोलवू."

रितेशने स्निग्धावर घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी करत नसल्याचा आरोप केला आहे. "ती दोन वेळा माझ्या घरातून पळून गेली आहे. मी घटस्फोटाची कागदपत्रं तयार केली आहेत, मात्र ती स्वाक्षरी करत नाहीये. तुम्ही बिग बॉसमध्ये मला पाहिलंत. माझा स्वभाव तुम्हाला कळालं असेल. मी असं कोणालाही मारहाण करणार नाही. स्निग्धा माझ्यावर खोटे आरोप करतेय. मी जर मारहाण करत असतो तर ती इतके दिवस माझ्याकडे का राहिली असती? मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींचा खुलासा करणार आहे", असं त्याने स्पष्ट केलं.

राखीच्या लग्नाबद्दल तो पुढे म्हणाला, "आम्ही दोघांनी परमेश्वराला साक्षी मानत एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला आहे. आम्ही आतापर्यंत कोर्ट मॅरेज केलं नाही. स्निग्धा मला घटस्फोट द्यायला तयार नाही. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत खूश आहे. आमचं बाळसुद्धा तिच्यासोबतच आहे. ती जाणूनबुजून माझ्या आयुष्यात समस्या निर्माण करतेय. स्निग्धाला घटस्फोट दिल्यानंतर लगेचंच मी राखीशी लग्न करेन."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT