mallika sherawat  
मनोरंजन

RK/RKAY Trailer: मेहबूबा गेली कुठं?मल्लिकाची एंट्री, नेटकरी घायाळ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावतचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मल्लिकाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे.

युगंधर ताजणे

RK/RKAY Movie Trailer : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावतचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मल्लिकाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. आणि तो चर्चेतही (social media viral news) आला आहे. बऱ्याच कालावधीनंतर मल्लिका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. रजत कपूरचा मल्लिका शेरावत अभिनित Rk/Rkay, हा चित्रपट 22 जुलै ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास पूर्णपणे सज्ज असून त्यापूर्वीच हा कॉमेडीपट शांघाय इंटरनॅशनल फिल्म (bollywood movie) फेस्टिव्हल, फ्लॉरेन्समधील रिव्हर टू रिव्हर यासह ऑस्टिन फिल्म फेस्टिव्हल आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्समध्ये गाजला आहे.

मल्लिकाच्या सस्पेन्सने भरलेल्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळाली निगेटिवमधून नायकाच्या गायब होण्याची अनोखी कहाणी ही आगामी भारतीय चित्रपट निर्मितीतील विनोदी ही एक कथा आहे. ही कथा प्रेक्षकांना चित्रपट जगतामागील रहस्यात घेऊन जाते. प्रेक्षकांना सस्पेन्ससह चित्रपट पाहण्यास भाग पाडणारा त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की हा चित्रपट एका चिंतीत दिग्दर्शकाच्या (आरके) एका वेधक कथेभोवती फिरतो ज्याने नुकतेच त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, परंतु या कथेला नवे वळण मिळते जेव्हा त्याला एडिटिंग रूममधून फोन येतो की, नेगटीव्हमधून नायक गायब झाला आहे. चित्रपटाची कथा पुढे सिनेजगतातील पडद्यामागील जगाचा वेध घेत ज्यात आरके आणि त्याची टीम नायकाचा शोध घेताना दिसतात.

प्रियांशी फिल्म्स (प्रियाम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे) निर्मित या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'RK/Rkay' रजत कपूर, मिथक टॉकी द्वारे लिहीले आणि दिग्दर्शित केले आहे आणि एनफ्लिक्स प्राइवेट लिमिटेड (नितीन कुमार आणि सत्यव्रत गौड) द्वारा प्रियाशी फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT