Rocking Star Yash's Movie Toxic Esakal
मनोरंजन

Rocking Star Yash's Movie: 'अ‍ॅनिमल' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी KGF स्टार यशचा 'टॉक्सिक' मैदानात! दमदार टिझर रिलिज!

आज टीझरद्वारे चित्रपटाची झलक आणि नाव जाहिर करण्यात आले आहे.

Vaishali Patil

KGF star Yash to announce title of his next film Toxic: सध्या मनोरंजन विश्वात फक्त रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचीच चर्चा आहे. 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. 'Animal' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे.

तर आता अ‍ॅनिमलने तयार केलेला रेकॉर्ड कोणता सिनेमा मोडू शकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात अ‍ॅनिमलचा रेकॉर्ड मोडण्यासाठी पुन्हा एक साउथ स्टार मैदानात उतरला आहे. हा साउथ स्टार म्हणजे 'KGF' स्टार यश.

'KGF' फ्रँचायझीच्या यशानंतर सुपरस्टार यशकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याच्या चाहत्यांची संख्याही जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशच्या नव्या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाचे नाव काय असेल याबाबत चाहते तर्क वितर्क लावत होते. या चित्रपटाचे नाव 'यश 19' असेल असं बोललं जात होतं मात्र आता या चित्रपटाचे नाव आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या चित्रपटाचे नाव 'टॉक्सिक' आहे. हा सिनेमा मल्याळम चित्रपट निर्माते गीतू मोहनदास तयार करत आहेत. याचे दिग्दर्शनही तेच करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती KVN प्रॉडक्शन करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे नाव 'यश 19' असे होते. मात्र आज टीझरद्वारे चित्रपटाची झलक आणि नाव जाहिर करण्यात आले आहे.

या चित्रपटात यश हा मुख्य भुमिकेत असून अभिनेत्री कोण असेल याबाबत अनेक चर्चा आहेत. या सिनेमात सई पल्लवी मुख्य भूमिकेत असे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती कन्नड सिनेमात पदार्पण करेल. मात्र अद्याप या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याबाबत पुर्ण माहिती मिळालेली नाही. मात्र जर साई या चित्रपटात काम करेल तर पहिल्यांदाच साई आणि यशची जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे.

चित्रपटाचा केवळ फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तरी देखील यशच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे.

हा सिनेमा अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाने लिहिले, हा चित्रपट इतिहार रचणार तर दुसऱ्याने लिहिले, टॉक्सिक हे हिंसेचे दुसरे नाव आहे या चित्रपटाची कथा ड्रग्ज माफियांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

आता चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाबाबत आणखी नवीन अपडेट जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT