Rocky aur Rani Ki Prem Kahani dharmendra and shabana azmi kissing scene viral ranveer singh alia bhatt SAKAL
मनोरंजन

Rocky aur Rani Ki Prem Kahani: सिनेमात शबाना आझमींसोबत लिपलॉक सीन, धर्मेंद्र म्हणतात, या वयात..

रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक सीन व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Rocky aur Rani Ki Prem Kahani News: रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिनेमा अनेकांना आवडतोय. रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात आलिया भट, रणवीर सिंग सोबतच शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन असे कलाकार सिनेमात सहभागी आहेत. अशातच रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनची चर्चा झालीय.

(Rocky aur Rani Ki Prem Kahani dharmendra and shabana azmi kissing scene)

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनची कोणालाच अपेक्षा नव्हती. एका सरप्राईज एलिमेंटसारखे हा सीन लोकांसमोर आला आणि सर्वांनाच धक्का दिला. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच या जोडीचा इंटिमेट सीन चर्चेत आला आहे. सीनच्या ट्विटवर स्वतः धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किसिंग सीनशी संबंधित एका लेखाची क्लिपिंग शेअर करत धर्मेंद्र यांनी ट्विटर वापरकर्त्यांना उत्तर दिले आहे. त्याने लिहिले, "मित्रांनो, रॉकी आणि राणीची प्रेमकथा... चित्रपट जरूर बघा... आणि सांगा... या वयात तुमचा धरम त्याची भुमिका साकारण्यात किती यशस्वी झालाय..."

लोकांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट आवडला, पण धर्मेंद्र आणि शबानाच्या किसिंग सीनवर मात्र फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय.

यावर अनेक युजर्सनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, "धर्मेंद्र आणि शबाना जी यांचे लिपलॉक अशी गोष्ट होती ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती आणि मला आश्चर्य वाटले."

याशिवाय एका युजरने कमेंट केली, "रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहिला. एक निरुपयोगी विषय. हा चित्रपट शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला समर्थन देतो. हा कसला कौटुंबिक चित्रपट आहे.

जिथे #AliaBhatt आणि #RanveerSingh दर पाच मिनिटांनी चुंबन घेतात. आपल्या जबाबदारीवर चित्रपट पहा. जया बच्चन यांचा अभिनय चांगला आहे." अशा कमेंट केल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT