Rocky Aur Rani ki Prem Kahani movie cbfc gives major changes released very soon Bollywood news SAKAL
मनोरंजन

Rocky Aur Rani ki Prem Kahani: रॉकी और रानी की प्रेम कहानी चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पण सिनेमात मोठा बदल

रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झालाय. पण त्यासाठी मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे.

Devendra Jadhav

Rocky Aur Rani ki Prem Kahani: करण जोहरचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा नवा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तेव्हापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

याशिवाय काही दिवसांपुर्वी या चित्रपटातील 'झुमका' हे नवं गाण रिलिज करण्यात आलं. मात्र चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला त्यावेळी ट्रेलरवरुन थोडा गोंधळ निर्माण झाला होता.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यावर बरेच वादविवाद सुरू केले आहेत. त्यामुळे वाद कोर्टात गेला. पण आता मात्र सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झालाय. पण त्यासाठी मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे.

(Rocky Aur Rani ki Prem Kahani movie cbfc gives major changes released very soon Bollywood news)

CBFC ने सांगीतलं कट

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. सेन्सॉर बोर्डाने काही कट सुचविल्यानंतर या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने प्रमाणित केल्याचे समोर आले.

शिव्यांच्या जागी वेगळे शब्द

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात केलेल्या काही बदलांमध्ये शिव्यांच्या जागी 'बहिण दी' हा शब्द समाविष्ट आहे. तसेच लोकप्रिय रम ब्रँड ओल्ड मॉंकचे नाव बदलून 'बोल्ड मॉंक' केले. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना लोकसभेचा वापर वगळण्यास सांगितले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राणीच्या घरी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे पोर्ट्रेट दाखवण्यात आले होते. या दृश्यात एका विशिष्ट शब्दाची जागा फिल्टरने घेतली आहे.

संवादांमध्ये बदल

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या चार दिवस आधी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाचे सखोल परीक्षण केले. यावेळी त्यांनी संवादांमध्ये अनेक बदल सुचवले.

एवढेच नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे निर्देश करणारा संवादही सिनेमातुन वगळण्यात आला आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला बुधवारी त्याचे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले, या चित्रपटाची लांबी 2 तास 48 मिनिटे आहे. हा सिनेमा २८ जुलैला रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT