Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office collection Day 1 Esakal
मनोरंजन

RARKPK BO Collection Day 1: रॉकीची रानी प्रेक्षकांनाही आवडली! पहिल्यांच दिवशी ग्रँड ओपनिंग करुन केली बक्कळ कमाई

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Vaishali Patil

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office collection Day 1: गेल्या काही दिवासांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक करण जोहरला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.

प्रेक्षक आणि समिक्षकांचाही या चित्रपाटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉलिवूडने जुना काळ पुन्हा मोठ्या पडद्यावर आणला आहे असं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सांगितलं.

त्याचवेळी, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.

ओपनिंग कलेक्शन...

मिडिया रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 11.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे. आता हे चित्रपटाच्या कमाईचे अंदाजित आकडे असले तरी अधिकृत आकड्यांमध्ये काही बदल होऊ शकतो. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये आलिया अन् रणवीरच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

आता या चित्रपटाला वीकेंडचा फायदा देखील मिळू शकतो कारण सध्या हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉलिवूड चित्रपट याला टक्कर देण्यासाठी नाही. त्याचा फायदा नक्कीच रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या चित्रपटाला होईल. विकेंडला हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करू शकतो.

रॉकी और रानी की प्रेमकहानी'बजेट

'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर 160 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला. ज्यात तुम्हाला करण जोहरच्या जून्या चित्रपटाची पुर्ण झलक दिसते.

हाय एनर्जी, ओव्हर-द-टॉप जोक, कधीकधी खूप मजा, खुप सारा मेलोड्रामा या सगळ्याचा अनुभव या चित्रपटात मिळेल. हा चित्रपट देशभरातील 3200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

मल्टीस्टारर चित्रपट..

'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटात अनेक हिट कलाकार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन, क्षिती जोग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT