Rocky Aur Rani Ki Prem Kahaani, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani poster launch, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani first look, karan johar, ranveer singh ,Rocky Aur Rani Ki Prem Kahani Movie Twitter Review Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Box Office Collection: Esakal
मनोरंजन

RARKPK BO Collection Day 10: रॉकी अन् रानीची प्रेम कहाणी 100 कोटींच्या पुढे निघाली; आलिया - रणवीरच्या सिनेमाने कमावले इतके कोटी....

रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीजच्या 10व्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला.

Vaishali Patil

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासुन या चित्रपटाची खुपच चर्चा होती. त्यातच आलिया आणि रणवीरची जोडीही प्रेक्षकांना खुप आवडत आहे तर चित्रपटातील धर्मेंद्र, आणि शबाना यांच्या जोडीने तर कमालच केली आहे.

हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच फायदा आता चित्रपटाच्या कमाईला देखील होत आहे. ओपनिंग वीकेंडनंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली होती तर आता पुन्हा शनिवार आणि रविवारी चित्रपटाने पुन्हा कमाईच्या बाबतीत झेप घेतली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 10व्या दिवशी चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 73.33 कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने 11.50 कोटींचा गल्ला जमवला. सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' ने रिलीजच्‍या 10व्‍या दिवशी 13.50 कोटींची कमाई केली आहे.

रविवारच्या कमाईचे आकडे लक्षात घेता चित्रपटाने कमाईच्या बाबतीत शतकाचा टप्पा पार केला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे कलेक्शन आता 105.08 कोटी रुपये झाले आहे.

गेल्या आठवड्यात या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी इतर कोणताही तगडा चित्रपट नसल्याने त्याचा फायदा या चित्रपटाला झाला होता. मात्र या आठवड्यात 'गदर 2' आणि 'OMG 2' असे बहूप्रतिक्षित चित्रपट रिलिज होणार असल्याने आता करण जोहरच्या चित्रपटावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओ निर्मित आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. तर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT