Rocky Aur Rani Ki Prem Kahaani, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani poster launch, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani first look, karan johar, ranveer singh Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer: Esakal
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Trailer : अब खेला होबे! प्रेम, परिवार अन् युद्ध..रॉकीच्या राणीला हजार प्रश्न मग कसं होणार लव्ह कनेक्शन?

Vaishali Patil

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Trailer  सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. आता त्यातच सुपर हिट कपल रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा बहूप्रतिक्षित आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता.

त्यातील तुम क्या मिले हे गाणंही काही दिवसांपुर्वीच रिलिज झालं ज्याला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. गाणं आणि चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला आहे.

या चित्रपटाद्वारे करण जोहर पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटाद्वारे करण पुन्हा एकदा प्रेक्षकांना 90 च्या दशकात घेवुन जाणार आहे. कुटुंब आणि प्रेमाची कथा तो रंगवणार आहे.

'रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ज्यात अनेक मोठे स्टार्स एकत्र दिसत आहेत. प्रेम आणि कुटुंबाभोवती फिरणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडू शकतो असे या ट्रेलरवरुन दिसते.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच रणवीर आणि आलियाच्या भांडणाने होते. जिथे आलिया रणवीरचं तोंड बंद करते आणि बोलतांना दिसते.

दोन वेगळे कुटूंब , त्याच्या वेगवेगळ्या पंरपरा, राहणीमान आणि घरातील वातावरणही वेगळं अशा परिस्थीती या दोघं घरातील रॉकी आणि राणी हे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

त्यानंतर घरच्यांना त्याचे प्रेम समजावुन सांगण्यासाठी दोघेही प्लॅन करतात आणि एकमेकांचे कुटुंब समजून घेण्याचे आव्हान स्वीकारतात.

कुटूंबाला समजावण्याच्या धडपडीत त्याच्यातील प्रेमालाही तडा जातो. स्टोरीत रणवीर त्याच्या फनी अंदाजात दिसतो. तर आलियाही तिच्या वेगळ्या अंदाजात दिसत आहे. जया बच्चन या रॉकी आणि राणीच्या लव्ह स्टोरीत व्हिलन असल्याचं दिसत आहे.

करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या वर्षी २८ एप्रिलला रिलीज होणार होता. करण जोहरचा मोस्ट अवेटेड कमबॅक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा राणी आणि रॉकीचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम 18 स्टुडिओजद्वारे केली जाते. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT