Rohit Sharma And Sourav Ganguly will Step Into The Movie Industry Through The Film Mega Blockbuster  sakal
मनोरंजन

Mega BlockBuster: सौरव गांगुली-रोहित शर्मा यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण..

'मेगा ब्लॉकबस्टर' या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता कपिल शर्मा यांच्यासह क्रिकेटर सौरव गांगुली आणि रोहित शर्मा देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

नीलेश अडसूळ

Mega BlockBuster : क्रिकेटर रोहित शर्मा आणि सौरव गांगुली एका प्रोजेक्ट दरम्यान एकत्र येणार असल्याची चर्चा होती. पण तो चित्रपट आहे, वेब सिरिज की जाहिरात याबाबत शंका होती. पण अखेर याचा उलगडा झाला आहे. हे दोन्ही क्रिकेटर एका दमदार चित्रपटात एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर नुकतेच जाहीर झाले असून चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. 'मेगा ब्लॉकबस्टर' असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता कपिल शर्मा यांच्यासह क्रिकेटर सौरव गांगुली (sourav ganguly) आणि रोहित शर्मा (rohit sharma) देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

त्यामुळे त्यांच्या 'मेगा ब्लॉकबस्टर' (Mega BlockBuster) या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या प्रोजेक्टमधील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि सौरव गांगुली हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच 'पुष्पा' फेम दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता कपिल शर्मा हे देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या सर्व कलाकरांनी या मेगा ब्लॉकबस्टरमधील त्यांच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रोहित शर्मानं त्याचा मेगा ब्लॉकबस्टरमधील लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे. सोबत एक कॅप्शनही दिले आहे. 'मी खूप एक्सायटेड आहे' असं रोहित म्हणाला आहे. तर सौरव गांगुलीनेही त्याच्या लुकची पोस्ट शेअर केली आहे. 'शूटिंग करताना मजा आली! मेगा ब्लॉकबस्टर लवकरच रिलीज होत आहे! ' असे कॅप्शन सौरव गांगुलीने दिले आहे. 4 सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉकबस्टरचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

(Rohit Sharma And Sourav Ganguly will Step Into The Movie Industry Through The Film Mega Blockbuster)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT