rohit shetty first marathi movie, school college and life teaser, jitendra joshi, shreyas talpade, vanita kharat SAKAL
मनोरंजन

Rohit Shetty: रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा, श्रेयस तळपदे - जितेंद्र जोशी - वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट

आता रोहित शेट्टी मराठीत एक सिनेमा घेऊन येतोय

Devendra Jadhav

रोहित शेट्टी हे बॉलिवूड सिनेमातलं मोठं नाव. पैसा वसूल करणारे हटके कॉमेडी सिनेमे करण्याबाबत रोहित शेट्टीला ओळखले जाते. रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांशी खास नातं आहे. आता रोहित शेट्टी मराठीत एक सिनेमा घेऊन येतोय.

या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित शेट्टी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी सिनेमाशी संबंध जोडणार आहे. सिनेमाचं नाव स्कुल, कॉलेज आणि लाईफ.

स्कुल, कॉलेज आणि लाईफ या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर रिलीज झालीय. या सिनेमातून मित्रांची खास गोष्ट पाहायला मिळतेय.

जितेंद्र जोशी गोदावरी नंतर पुन्हा एकदा स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेमात झळकणार आहे. जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर त्याला हा सिनेमा कसा मिळाला याचा अनुभव शेयर केलाय.

जितू लिहितो, एक दिवस रोहित शेट्टी सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलावलं जातं समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक .

रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहान च्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचा ची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो . चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं .

जितेंद्र जोशी पुढे लिहितो, मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोन वर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय.

एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो हीच कमाल आहे चित्रपट या माध्यमाची..

खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच सर्वांना शुभेच्छा!!

असं म्हणत जितेंद्र जोशीने सिनेमाचा टिझर कसा वाटतोय हे त्याच्या फॅन्सना कळवायला सांगितलं आहे.

सिनेमात श्रेयस तळपदेचा बॅकग्राऊंड आवाज दिसत असून जितेंद्र जोशी, वनिता खरात आणि बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाश झळकत आहे. १४ एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय १४ एप्रिलला स्कुल, कॉलेज आणि लाईफ हा सिनेमा रिलीज होतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT