rohit shetty said why he cast give chance marathi actors in his films  sakal
मनोरंजन

Rohit Shetty Birthday: का देतो रोहित शेट्टी मराठी कलाकारांना बॉलीवुडमध्ये काम? त्यानेच सांगितलं कारण..

चित्रपटात का दिसतात मराठी कलाकार.. कारण ऐकून अभिमान वाटेल..

नीलेश अडसूळ

Rohit Shetty birthday: बॉलिवूडमधील धमाकेदार दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. आता तो धमाकेदार का आहे हे त्याचे चित्रपट पाहून कळतच. जोरदार अ‍ॅक्शन, आलीशान गाड्या आणि ह्युमरस कॉमेडी यांचा परफेक्ट मेळ साधून दर्जेदार चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज वाढदिवस.. रोहित आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

रोहितचे अनेक चित्रपट आपण पाहिले आणि प्रेक्षकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतले. गोलमाल, सिंघम, सर्कस असा कोणताच चित्रपट आपण विसरू शकत नाही. पण त्याच्या सगळ्या चित्रपट एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे मराठी कलाकार.

रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटात आवर्जून मराठी कलाकारांना संधी देतो आणि तेही चांगल्या दर्जेदार भूमिका देतो. तो मराठी कलाकारांची निवड का करतो या मागेही एक खास कारण आहे, ते त्यानेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

(rohit shetty said why he cast give chance marathi actors in his films )

रोहितच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, वैदेही परशुरामी अशा अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकले आहेत. त्यामुळे तुझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात, त्यामागे नेमकं काय कारण आहे असे त्याला विचारले गेले.

यावेळी तो म्हणाला, 'मी मराठी कलाकारांना चित्रपटात का घेतो? हा प्रश्न मला खूप ठिकाणी विचारण्यात येतो. मात्र, यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार हे एकदम साधे असतात. तत्यांचा अभिनय तर कमालीचा असतोच शिवाय त्यांना कुठलाही अहंकार नसतो.'

पुढे तो म्हणाला, 'चांगला अभिनय येतो म्हणून काही कलाकार मंडळी नखरे करताना दिसतात. परंतु, मराठी कलाकारांमध्ये एक खास गुण आहे, तो म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. आमचे चित्रपट १०० कोटींचा बिजनेस करतात, यातला ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. त्यामुळेच माझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात आणि नेहमीच असणार!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT