ajay and rohit
ajay and rohit 
मनोरंजन

पुन्हा एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण येणार 'या' सिनेमासाठी एकत्र

सकाळवृत्तसेवा

मुंबई- दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी एकत्र अनेक हिट सिनेमे दिले आहेत. या जोडीची कमाल म्हणजे बॉक्स ऑफीसवर यांच्या सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.  या ऍक्शनपूर्ण जोडीची गोलमाल आणि सिंघम फ्रँचायजी लोकांना चांगलीच आवडली होती. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या एकत्र येण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे तुम्ही जर या जोडीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरंच ही जोडी तुमच्यासाठी सिनेमा आणण्याच्या तयारीत आहे. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी लवकरंच 'गोलमाल' सिरीजच्या आगामी सिनेमावर काम करायला सुरुवात करणार आहे. रोहितचं म्हणणं आहे की 'सुर्यवंशी'चं काम जसं संपेल त्यानंतर लगेचच तो 'गोलमाल ५' या सिनेमावर काम करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे अजयच्या चाहत्यांना अजयला पुन्हा एकदा कॉमेडी अवतारात पाहण्याची संधी मिळणार आहे. 

रोहित शेट्टीचा 'सुर्यवंशी' हा सिनेमा कोरोना व्हायरसच्या कारणामुळे लॉकडाऊनमध्ये अडकला आहे. हा सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार होता मात्र आता हा सिनेमा जेव्हा थिएटर सुरु होतील तेव्हाच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'सुर्यवंशी' या सिनेमात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. 

'गोलमाल ५' वर रोहित शेट्टी लॉकडाऊनमध्ये काम करायला सुरुवात तर करणार आहे मात्र यासाठी प्रेक्षकांना किती काळ याची वाट पाहावी लागेल हे मात्र सांगता येत नाही. मात्र लॉकडाऊन संपला आणि शूटींगची परवानगी मिळाली की रोहित लगेचच त्याच्या आगामी सिनेमांची जोरदार तयारी करेल हे मात्र नक्की.

रोहितच्या सिनेमांमध्ये भरपूर ऍक्शन असते, गाड्यांची तोडफोड असते, फायटिंग सीन असतात त्यामुळे हजारोंच्या संख्येने यावर काम करणारं मनुष्यबळ त्याला लॉकडाऊनच्या काळात तरी एकत्र आणता येणं शक्य होणार नाही..आणि म्हणूनंच रोहित शेट्टीला त्याच्या सिनेमांचं शूट सुरु करण्यासाठी लॉकडाऊन संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.   

rohit shetty wants to work on golmaal5 with ajay devgn soon after lockdown  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT