rohman shawl on getting married with Sushmita Sen 
मनोरंजन

दरवेळी एकच प्रश्न,तुम्ही लग्न कधी करणार?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - त्याचं झालं असं की, 2018 मध्ये शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीमध्ये रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन हे हातात हात घालून पार्टी इंजॉय करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्या दोघांच्या नात्यावरुन प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली होती. अर्थात त्याचा दोघांवर काही एक परिणाम झाला नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचं एकमेकांना डेट करणे सुरु आहे. दोघेही लिव इन मध्ये राहतात. असे म्हटले गेले. रिलेशनशिप नंतर त्यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. दरवेळी एकच प्रश्न तुम्ही लग्नं कधी करणार, त्यामुळे त्या दोघांनाही माध्यमांनी त्रस्त केले होते. त्या प्रश्नावर कुणी काही बोललं नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी रोहमन शॉलला सुष्मिता सेन सोबत लग्न करण्याविषयी विचारले असता त्याने सांगितले की, आम्ही सगळे एक परिवार आहोत. जेव्हापासून मी सुश्मिताला भेटलो आहे तेव्हापासून माझे आयुष्य बदलून गेलं आहे. सध्या सुष्मिता आणि रोहमन हे लिव्ह इन मध्ये राहत आहेत. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रोहमन पॉल यांनी सांगितले की, सुष्मिता तिच्या मुली आणि मी आम्ही सर्वजण एका परिवारासारखे आहोत. आमच्यात कुठलाही वाद नाही. सर्वजण प्रेमाने राहतो. कित्येकवेळा मी त्या मुलींचा बाप झालो आहे. काहीवेळा मित्र बनलो आहे. आमच्यात गंमती जंमती होत असतात. त्याचा आनंदही आम्ही घेतो. त्यावेळी मला आणि सुष्मिताला आमच्या लग्नाविषयी जे प्रश्न विचारले जातात त्याला उत्तर देण मला योग्य वाटत नाही. 

जेव्हा आमचे लग्न होईल तेव्हा होईल. मात्र त्याची चर्चा आता कशाला हे काही कळत नाही. ज्यावेळी आम्हाला लग्न करायचे असले तेव्हा आम्ही ते कुणापासून लपवून ठेवणार नाही. सध्या आम्ही सुष्मिताची जी वेबसीरिज प्रदर्शित झाली होती त्याचे सक्सेस आम्ही एजाँय करतो आहे. त्यामुळे पुढे काय करायचे याचा काही विचार केलेला नाही. मागील वर्षी सुष्मिताची आर्या नावाची मालिका आली होती. तिला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यातील सुष्मिताच्या भूमिकेलाही पसंत करण्यात आले होते. त्यावरुन रोहमननं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT