Ronit Roy Renewed his Wedding:  Esakal
मनोरंजन

Ronit Roy Wedding: अरबाजनंतर 58 वर्षीय रोनित रॉयही दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! 16 वर्षाच्या मुलानेही लावली हजेरी

Ronit Roy Renewed his Wedding: रोनितच्या लग्नाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Ronit Roy Renewed his Wedding: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत 24 डिसेंबर रोजी लग्न केले. त्याची बहीण अर्पिताच्या मुंबईतील घरी लग्न सोहळा पार पडला. आता आणखी एका अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. तो अभिनेता म्हणजे रोनित रॉय.

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात रोनित रॉयने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. रोनित रॉय आपल्या लूक आणि दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले केले आहे.

तो वयाच्या 58 व्या वर्षीही फिट आहे. मात्र आता रोनित त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रोनितने वयाच्या 58 व्या वर्षी पुन्हा लग्न केले आहे. सध्या सोशल मिडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोंवर कमेंट करत आहे.

वास्तविक, रोनित रॉयने दुसऱ्यासोबत नाही तर त्याची पत्नी नीलम बोस रॉयसोबत पुन्हा लग्न केले आहे. रोनितने त्यांच्या लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाशी पत्नीशी पुन्हा लग्न केले आहे.

त्याने आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओत जोडप्यांनी 20 वर्षांनंतर पुन्हा लग्नाचे सर्व विधी पुर्ण केले आहे. तर या खास दिवशी रोनित आणि नीलमचा मुलगा अगस्त्य बोस देखील आई-वडिलांसबोत दिसला.

यावेळी रोनित रॉयची पत्नी नीलमने लाल साडी नेसले होती तर रोनित रॉयने पांढरा आणि लाल कुर्ता-पायजमा परिधान केलेला दिसला. व्हिडिओ शेअर करताना रोनितने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का?' रोनितने गोव्यातील मंदिरात लग्न केले आहे

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रोनित रॉयबद्दल बोलायचे झाले तर रोनितने मॉडेल नीलम सिंहसोबत 2003 मध्ये दुसरे लग्न केले होते. नीलमला दोन मुले आहेत. नीलमच्या आधी रोनितने जोहानासोबत लग्न केले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर रोनितने नीलमसोबत लग्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT