RRKPK Day 2 Collection Esakal
मनोरंजन

RRKPK Day 2 Collection: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' भलतीच भारी! दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डंका

Vaishali Patil

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Day 2 Collection: मनोरंजन विश्वात सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची तुफान चर्चा आहे. एकीकडे करणने पुन्हा तोच मेलो ड्रामा मोठ्या पडद्यावर दाखवला असं म्हणत काही लोक त्यांच्यावर टिका करत आहेत तर दुसरीकडे करणने बॉलिवूडच्या जून्या दिवसांची आठवण करुन दिली असं म्हणतं त्याचे कौतुक करणारेही काही लोक आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका असलेला हा सिनेमा भलताच चर्चेत आहे.

आलियाचे चाहते तिला पाहण्यासाठी उत्सूक होते तर रणवीरनंही त्याची जादू दाखवल्याचं बोललं जात आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा होत्या आणि चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता ती अपेक्षा पुर्ण झाल्याचं दिसत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11.50 कोटींची कमाई केली होती आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 16 कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र या आकड्यात थोड्याफार प्रमाणात बदल असू शकतो. तर दोन दिवसांची कमाई पाहता या चित्रपटाने दोन दिवसात एकूण 27.10 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट आलिया आणि रणवीरच्या कहानीपेक्षा जास्त धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात दाखवण्यात आलेल्या किसिंग सीनची चर्चा आहे.

कंगना राणौतने चित्रपट पाहिल्यानंतर करणवर टिकास्त्र सोडले होते. 250 कोटी खर्च करुन डेली सोप तयार केला , करणने आता निवृत्त व्हावं असा सल्ला तिने दिला तर रणवीरच्या अतंरगी कपड्यांचाही समाचार घेतला.

चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT