RRR 2 Big Update: Esakal
मनोरंजन

RRR 2 Big Update: राजामौलींच्या वडिलांनी दिली 'RRR 2' बद्दल मोठी अपडेट! 'या' देशात होणार शूटिंग सुरु..

राजामौली यांच्या आरआरआरच्या सिक्वेलबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Vaishali Patil

RRR 2 Big Update: दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट ऐतिहासिक ठरला. या चित्रपटाने जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार ऑस्कर 2023 मध्ये डंका वाजवला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.

त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढली. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी त्याचा सिक्वेल जाहीर केला आहे. तेव्हापासून चाहते या चित्रपटाबद्दल येणारे अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सूक आहेत. आता राजामौली यांच्या आरआरआरच्या सिक्वेलबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या 'RRR 2' या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर निर्माते आणि लेखक काम करत आहेत. आता या चित्रपटाच्या शुटिंगबद्दल अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शुटिंग आता आफ्रिकेत सुरु होत आहे.

एसएस राजामौली यांचे वडिल विजयेंद्र प्रसाद यांनी खुलासा करत सांगितले होते की, या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा आफ्रिकेत सुरू होईल. 'RRR' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्यांनी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यासोबत ही स्टोरी आफ्रिकेत दाखवतील असा सिक्वेल बनवण्यात येइल. आता सध्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे.

या मुलाखतीत विजयेंद्र प्रसाद यांनी हे देखील सांगितले की, त्याचा मुलगा म्हणजेच दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या साउथस्टार महेश बाबूसोबत चित्रपटाच शुटिंग करत आहे. तो चित्रपट पुर्ण झाल्यानंतरच ते RRR 2 वर काम करणार आहे.

पुढे ते म्हणतात की त्यांना त्यांच्या मुलाचा स्वभाव चांगल्याप्रकारे माहित आहे. जो पर्यंत महेशसोबतच्या चित्रपट पुर्ण करत नाही तोपर्यंत राजामौली दुसऱ्या चित्रपटाकडे म्हणजेच RRR 2 कडे लक्ष देणार नाही. राजामौली आणि दोन्ही हिरोंना या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली की चित्रपटाचं शुटिंग सुरु करणार आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वीच दिग्दर्शक राजामौली यांनी चाहत्यांना सांगितलं होतं की त्यांचे वडिल विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. त्यानंतर ते RRR 2 चं शुटिंग सुरु करतील. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाने 1200 कोटींच्या वर कमाई केली होती. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी उत्सूक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT