SS Rajamouli with wife  esakal
मनोरंजन

SS Rajamouli : 'तुम्ही दोघेही किती साधे, तुम्हाला ऑस्कर मिळो!' रेड कार्पेटवर 'मिस्टर अँड मिसेस राजामौलीं'ची ग्रँड एंट्री

नाटू नाटू गाण्यानं केलेली कमाल आणि त्याला मिळालेला गोल्डन ग्लोब यामुळे ऑस्कर फार काही लांब नाही. अशा प्रतिक्रिया राजामौली यांना मिळताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

RRR Golden Globe Awards: जगभरामध्ये राजामौली यांच्या आरआरआऱवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. नाटू नाटू गाण्यानं केलेली कमाल आणि त्याला मिळालेला गोल्डन ग्लोब यामुळे ऑस्कर फार काही लांब नाही. अशा प्रतिक्रिया राजामौली यांना मिळताना दिसत आहे.

एस एस राजामौली हे त्यांच्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या बाहुबली चित्रपटानं देखील जगभरातून मोठी कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या आरआरआरनं देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तर ऑस्करमध्ये या चित्रपटाची वर्णी लागल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Also Read - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

गोल्डन ग्लोबसाठी आरआरआरचे दिग्दर्शक सपत्नीक पोहचले होते. त्यावेळी त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स मिळताना दिसत आहे. आता फक्त ऑस्कर मिळण्याची प्रतिक्षा आहे. असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर एस एस राजामौली आणि त्यांच्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहताच चाहत्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यावरील प्रतिक्रिया भन्नाट आहे. एकानं तर तुम्ही दोघेही किती साधे आहात, तुमच्या चित्रपटाला ऑस्कर मिळणार हे नक्की. आम्हा सर्व चाहत्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. असं म्हटलं आहे.

तुम्ही परदेशात देखील भारतीय परंपरा आणि संस्कृती जपली आहे. त्याबद्दल तुमचे कौतूक. आणि आरआरआऱला मनपूर्वक शुभेच्छा ऑस्करच्या शर्यतीत असणाऱ्या आपल्या चित्रपटाला तो पुरस्कार मिळेल यात शंकाच नाही. अशा शब्दांत चाहत्यांनी राजामौली यांना पाठींबा दर्शवला आहे.

गाण्यासाठी मिळाला गोल्डन ग्लोब -

राजामौली यांच्या आरआऱआऱ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब मिळाले आहे. त्याची जगभर चर्चाही आहे. आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजामौली यांच्या आरआऱआऱ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी आरआरआऱला ऑस्कर मिळावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

आऱआऱआरने परदेशी चित्रपट आणि ओरिजनल साँग या कॅटगिरीमध्ये ऑस्करच्या यादीत स्थान मिळवले आहे. यंदा भारताचे पाच चित्रपट ऑस्करच्या वेगवेगळया कॅटगिरीसाठी शॉर्टलिस्ट आहे. यासगळ्यात कुणाच्या पारड्यात ऑस्कर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI : रोहित, विराट यांना शेवटची संधी? जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याची वेळ, ठिकाण अन् Live कुठे पाहाल

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

कन्नड आणि हिंदीनंतर थिएटर गाजवणारा कांतारा पार्ट 1 येणार English मध्ये ! 'या' तारखेला होणार रिलीज

Latest Marathi News Live Update : दहिसर पूर्व अंबावाडीमध्ये फटाका फोडण्यावरून तरुणाला मारहाण

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

SCROLL FOR NEXT