RRR movie called to be gay love story by oscar winner resul pookutty esakal
मनोरंजन

RRR Sequel: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या 'RRR'चा येणार सिक्वल; राजामौलींची घोषणा

नुकताच या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड जाहीर झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणारा आणि ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या 'RRR' या सिनेमानं गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड पटकावला आहे. या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पण आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे, ती म्हणजे RRRचा आता सिक्वल येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड्स २०२३ मध्ये बोलताना यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (RRR movie Sequel Director S S Rajamouli announcement at Golden Globe award 2023)

गोल्डन ग्लोब अॅवॉर्डसच्या रेड कार्पेटवर RRR च्या सिक्वेलबाबत बोलताना राजामौलींना विचारण्यात आलं की, RRR च्या सिक्वेलवर किती काम झालं आहे? यावर ते म्हणाले, "याची कथा सध्या लिहिली जात आहे" याद्वारे त्यांनी सिक्वेलच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं.

राजामौली म्हणाले, जेव्हा हा सिनेमा रिलिज झाला तेव्हा लोकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं होतं. त्याचवेळी या सिनेमाचा सिक्वल बनवण्याचा अर्थात पुढचा भाग बनवण्याचा विचार मनात आला होता.

आमच्याजवळ यासाठी काही आयडिया होत्या, पण त्यापैकी एकही प्रभावशाली नव्हती" अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

राजामौली पुढे म्हणाले, पश्चिमी देशांमध्ये या चित्रपटाला खूपच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काही आठवड्यांपूर्वी मी माझे वडील आणि चुलत भावासोबत बसून यावर विचार करत होतो. पण जोपर्यंत याची कथा पूर्ण होत नाही, तोपर्यंत यावर आम्ही जास्त बोलू शकत नाही. पण आम्ही यावर काम करत आहोत.

हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

'नाटू नाटू'नं हॉलिवूडच्या दिग्गजांना हारवलं

गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड्स २०२३ मध्ये ओरिजिनल सॉंग कॅटेगिरीमध्ये आरआरआरच्या 'नाटू नाटू' या गाण्यानं हॉलिवूड गायिका रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांना नॉमिनेशनमध्ये हारवून बेस्ट ओरिजिनल गाण्याचा किताब जिंकला.

RRR हा सिनेमा गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. यामध्ये ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण हे मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांनी नाटू नाटू या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT