Natu Natu Oscar 2023  
मनोरंजन

Natu Natu Oscar 2023 : हॉलीवूडचा टॉम क्रुझ 'नाटू नाटू' च्या प्रेमात! 'तुमचं गाणं हे...'

यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रुझच्या प्रतिक्रियेनं RRR चे चाहते भारावले आहे. टॉमनं RRR चे कौतूक केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Natu Natu Oscar 2023 : केवळ भारतामध्ये नाहीतर जगभरामध्ये सध्या RRRचे कौतूक सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्यानं बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या कलाकारांनी राजामौलींच्या RRR वर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

आता हॉलीवूडच्या टॉम क्रुझची प्रतिक्रिया समोर आली आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक आणि यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळवणाऱ्या स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्यासह त्यांच्या पत्नीनं देखील RRR ची प्रशंसा केली आहे. नाटू नाटू गाण्याचे गीतकार चंद्रबोस यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

एका मुलाखतीमध्ये चंद्रबोस यांनी नाटू नाटू विषयी हॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी काय प्रतिक्रिया दिल्या याविषयी सांगितले आहे.यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रुझच्या प्रतिक्रियेनं RRR चे चाहते भारावले आहे. टॉमनं RRR चे कौतूक केले आहे. त्याच्या विषयी बोलताना चंद्रबोस म्हणाले की, मी जेव्हा त्याला भेटून ओळख करुन दिली तेव्हा त्यानं मला नाटू नाटू खूप आवडल्याचे सांगितले. याशिवाय तो चित्रपटही खूप भावला असे सांगितले. तेव्हा टॉम सारख्या अभिनेत्याला RRR आवडला हे ऐकून आनंद झाल्याची भावना चंद्रबोस यांनी यावेळी व्यक्त केली होती.

त्या व्हिडिओमध्ये चंद्रबोस यांनी म्हटले आहे की, जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्गच्या पत्नीनं देखील RRR चं कौतूक केले आहे. त्यांनी हा चित्रपट दोनवेळा पाहिला आहे. त्याना तो खूप आवडला. यापूर्वी प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी देखील एस एस राजामौलींच्या RRR चे कौतूक केले होते. यावेळी त्यांनी राजमौली यांना आपल्या एका प्रोजेक्टमध्ये सोबत काम करण्याचा प्रस्तावही दिला असल्याची माहिती RRR च्या प्रसिद्धी टीमच्या वतीनं देण्यात आली होती.

RRR च्या अधिकृत ट्विटरवरुन देखील त्यांच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यात आला आहे. त्यांनी शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही खरचं धन्य आहोत की, RRR हा चित्रपट हा एक ऐतिहासिक चित्रपट ठरला आहे. त्यानं साऱ्या देशाला खूप आनंद दिला आहे. आज भारतामध्ये RRR विषयी आदराची आणि कृतज्ञतेची भावना आहे. RRR हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यानं बेस्ट ओरिजनल साँग या कॅटगिरीतून ऑस्कर प्राप्त केला आहे. याचा आनंद काही वेगळाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT