RRR Natu Natu Song Tesla 150 Song SS Rajamouli  esakal
मनोरंजन

Viral Video : 'नाटू नाटू' च्या गाण्यावर टेस्लाच्या गाड्याही नाचल्या! राजामौलींनी केलं कौतूक

गाड्यांच्या टायटलमध्ये RRR असे लिहिल्याचे दिसत आहे. एम एम किरवानी यांनी लिहिलेल्या नाटू नाटू गाणं जगभरामध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

RRR Natu Natu Song Tesla 150 Song : भारताला ज्या गाण्यानं ऑस्कर मिळवून दिलं त्या नाटू नाटूची चर्चा अजुनही सुरुच आहे. केवळ भारतीयांनाच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये नाटू नाटूनं चाहत्यांना वेडं केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआऱआऱ या चित्रपटानं जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता नाटू नाटू वर सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. ऑस्करमध्ये नाटू नाटूचे सादरीकरण झाले तेव्हाही राजामौली आणि त्यांच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव झाला होता. प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीनं देखील RRR च्या नाटू नाटूला आगळी वेगळी सलामी दिली आहे. त्यांनी केलेलं कौतूक राजामौली यांना देखील भावलं आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

लेडी गागा आणि रिहाना यांच्यासारख्या कलाकारांना मागे सोडत राजामौली यांच्या चित्रपटानं बाजी मारल्याचे दिसून आले. नाटू नाटूला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट गाणं या प्रकारामध्ये पुरस्कारानं घोषित करण्यात आले होते. त्यानंतर संबंध देशामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. आता राजामौली यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये १५० पेक्षा टेस्लाच्या कार नाटू नाटू गाण्यावर चमकत असल्याचे दिसून आले आहे.

गाड्यांच्या टायटलमध्ये RRR असे लिहिल्याचे दिसत आहे. एम एम किरवानी यांनी लिहिलेल्या नाटू नाटू गाणं जगभरामध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमधील गाड्यांची लाईट चालू बंद होते आहे. यासगळ्यासाठी राजामौली यांनी टेस्ला यांना धन्यवाद म्हटले आहे. राजामौली यांनी लिहिलं आहे की, नाटू नाटू ला टेस्लानं सलामी देणं हा माझा केवळ विचार होता. पण आता जे दिसते आहे ते भन्नाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: पावसाचा कहर! वरंधा घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT