Jr NTR in a still from RRR.
Jr NTR in a still from RRR.  Google
मनोरंजन

कलेक्शनमध्ये RRR ठरणार 'बाहुबली'; हजार कोटींकडं घोडदौड

युगंधर ताजणे

RRR Worldwide Box Office- प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआऱनं विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. या चित्रपटानं नवा इतिहास आपल्या नावावर करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर आरआरआरचा बोलबाला आहे. वास्तविक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यानं प्री बुकिंगमधून 300 कोटींहून अधिक बिझनेस केला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला आहे. RRRने दोन आठवडे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आरआरआरच्या हिंदी व्हर्जननं दोनशे कोटींचा टप्पाही नुकताच पूर्ण केल्यानं निर्मात्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आरआरआरच्या टीमनं त्यांना मिळालेल्या यशानंतर ग्रँड सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सहभाग घेतला होता. त्यात बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचाही समावेश होता. त्यानं पूर्वी देखील आरआऱआरचं कौतूक केलं होतं. तर सलमान खाननं टॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूडमध्येही पुन्हा हिरोइझम येण्याची गरज असल्याचे एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. आरआरआरच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे RRR ने नुकताच हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये हा चित्रपट तो टप्पा पार करेल. असा विश्वास निर्माते आणि दिग्दर्शक यांना आहे. 25 मार्चमध्ये RRR थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 7 एप्रिलला या चित्रपटानं दोन आठवडे पूर्ण केले आहेत.

बॉक्सच्या रिपोर्टनुसार गुरूवारी या चित्रपटानं सहा कोटींचा व्यवसाय केला. त्यानुसार 14 दिवसांचे कलेक्शन 209 कोटी झाले होते. दुसऱ्या आठवड्यामध्ये RRRला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 25 ते 31 मार्चपर्यत RRRने 132 कोटी रुपयांची कमाई केली होती. RRR ला जगभरातून किती मोठा प्रतिसाद मिळाला आहे हे पाहायचे झाल्यास, तीन दिवसांत 500 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. आणि आता RRR हा हजार कोटींकडे जात आहे. बाहुबलीच्या विक्रमाला RRR गवसणी घालणार का, असा प्रश्न आता नेटकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून RRR मुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

आता RRR ला पुढील आठवड्यात यशच्या केजीएफ च्या दुसऱ्या पार्टसोबत काट्याची टक्कर आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते यशच्या केजीएफच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्सचा वेगही आता मंदावलेला दिसत आहे. या चित्रपटानं देखील दोनशे कोटींची कमाई करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT