Rubina’s gym trainer shared a post with the actress esakal
मनोरंजन

Rubina Dilaik Good News : रूबीनाची गोड बातमी आली, जुळ्या मुलींची आई झाली! ट्रेनरच्या त्या पोस्टनं....

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलेकची गोड बातमी आता समोर आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Rubina’s gym trainer shared a post with the actress : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलेकची गोड बातमी आता समोर आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुबीना इंस्टावरुन वेगवेगळे फोटो शेयर करुन लाईमलाईटमध्ये आली होती. रुबीनानं जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. तिच्या बेबी बंप फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

टीव्ही मनोरंजन आणि बिग बॉसमध्ये देखील आपल्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रुबीनाच्या घरी दोन नव्या पाहुण्या आल्या आहेत. चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देखील दिल्या आहेत. खरं तर रुबीनीच्या ट्रेनरनं काही वेळेपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यात तिला जुळ्या मुली झाल्याची माहिती होती. मात्र काही वेळानं ती पोस्ट डिलीट करण्यात आली होती. Rubina’s gym trainer shared a post with the actress

त्याचं झालं असं की, रुबीनाच्या जिम ट्रेनरनं एक पोस्ट केली होती. त्यात रुबीनाला जुळ्या मुली झाल्याचा उल्लेख केला होता. मात्र पुन्हा काही वेळेतच ती पोस्टही डिलीट करण्यात आली. यानंतर नेटकरी कोड्यात पडले की, रुबीनाची ती पोस्ट तिच्याच ट्रेनरनं डिलीट का केली... ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र सोशल मीडियावरुन रुबीनावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच्या इंस्टावरील त्या व्हायरल फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. रुबीना आणि अभिनव शुक्लाच्या त्या पोस्टनं दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले होते.

१६ डिसेंबर रोजी रुबीनाच्या फॅन पेजच्या माध्यमातून एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात असे म्हटले गेले होते की, रुबीना ही जुळ्या मुलींची आई झाली आहे. मात्र त्यानंतर ती पोस्ट एडिट करण्यात आली. रुबीनाची ट्रेनर त्यांनी ती पोस्ट केल्याचे बोलले जाते. २०१८ मध्ये रुबीना आणि अभिनव शुक्ला यांनी लग्न केले होते. त्या दोघांना बिग बॉसमध्ये पहिल्यांदा पाहिले गेले. बिग बॉसपासून त्यांची केमिस्ट्री हा नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. बिग बॉसच्या त्या पर्वाची रुबीना विजेती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT