Rubina Dilaik, Abhinav Shukla share first photo of twin girls, reveal their names Esakal
मनोरंजन

Rubina Dilaik: अखेर रुबीनाने खुलासा केलाच! जुळ्या मुलांचा फोटो शेअर करत नावंही सांगितली

रुबिना दिलैकने दाखवली तिच्या जुळ्या मुलींची पहिली झलक!

Vaishali Patil

Rubina Dilaik, Abhinav Shukla share first photo of twin girls:टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. रुबीना आई झाली असून तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रुबीनाच्या जिम ट्रेनरनं पोस्ट शेयर करत तिने दोन मुलींना जन्म दिला असल्याची बातमी शेयर केली होती मात्र काही काळातच त्याने ही पोस्ट डिलिट केली.

तर दुसरीकडे रुबीनाने या बातमीला दुजोरा दिला नव्हता. रूबीना आणि अभिनवने याबाबत चाहत्यांना काहीही सांगितले नव्हते मात्र आता दोघांनी सोशल मिडियावर ही एक खास पोस्ट शेयर करत चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेयर केली आहे.

आता रुबिनाने तिच्या मुली एक महिन्याच्या झाल्यावर आपल्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रुबिनाने सोशल मिडियावर पाच फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत रुबिना पती अभिनव शुक्लासोबत उभी दिसत आहे. या फोटोत दोघांनी स्काय ब्लू रंगाचा आउटफिट घातला आहे. दोघींनी लहान मुलींना हातात पकडलेले आहे.

तर दुसऱ्या फोटोत त्यांनी बाळाचा हात हातात धरलेला दिसत आहे. तर एका फोटोत रुबिना हवन पूजा करताना दिसत आहे.

याशिवाय, एका ग्राफिक इमेजमध्ये त्यांनी लहान मुलींची नावे चाहत्यांना सांगितली आहे. त्यांनी एका मुलीचे नाव 'इधा' आणि दुसऱ्याचे 'जिवा' ठेवले आहे.

आपल्या मुलींचे फोटो पोस्ट करताना, रुबिनाने एक कॅप्शन देखील लिहिले, ज्यामध्ये तिने सांगितले की गुरुपर्वाच्या दिवशी तिच्या घरी मुलींचा जन्म झाला. ती लिहिते, "आमच्या मुली, जिवा आणि इधा आज एक महिन्याच्या झाल्या आहेत हे सांगताना खूप आनंद होत आहे. गुरुपर्वाच्या शुभदिनी देवाने आशीर्वाद दिला! आमच्या परींसाठी तुम्ही आशिर्वाद द्या."

रुबिना बद्दल बोलायचं झालं तर तिला 'छोटी बहू', 'शक्ती' या मालिकांमधुन प्रसिद्धी मिळाली. ती बिगबॉसची विजेती आहे. ती 'खतरों के खिलाडी' शोमध्येही दिसली आहे. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT