Rubina Dilaik Pregnancy Rumours:  Esakal
मनोरंजन

Rubina Dilaik: काय गं रुबिना गुडन्यूज आहे ना? 'त्या' व्हिडिओनं चर्चांना उधाण

Vaishali Patil

Rubina Dilaik Pregnancy Rumours: मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉसची 14 ची विजेती रुबीना दिलैक ही सध्या चर्चेत आली आहे.

रुबीना ही अनेक मालिकांच्या माध्यमातुन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. तिचा चाहतावर्ग ही मोठा आहे.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या रुबीनानं तिच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे.

रुबिना सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे तरी देखील ती चर्चेत असतेच. मात्र आता रुबिना दिलीक तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आली आहे.

तिने शेयर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रुबिना खुप स्टाईलिश तर दिसत आहे मात्र यात तिचा बेबी बंपही दिसत आहे.

त्याने रुबीना आई होणार असल्याची चर्चा तिचे चाहते करत आहेत. इतकच नाही तर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

रुबिनानं शेयर केलेल्या व्हिडिओत तिने ब्लॅक कॅज्युअल गाऊन , नंतर हाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. पर्पल फ्लोरल गाऊनमध्ये रुबिनाचे सौंदर्य आणखीणच खुलून आले आहे. या व्हिडिओत रुबिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

खुप दिवसांनंतर रुबिना सोशल मिडियावर ही पोस्ट केली आहे त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली. त्यातच व्हिडिओत तिचा बेबी बंप दिसत असल्याच्या चर्चांमुळे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी तिला हाच प्रश्न विचारला आहे. नेटकरी चाहते तिच्या बेबी बंपवर कमेंट करत आहे. इतकच नाही तर अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. काहींनी रुबिनाने खुप दिवसांनंतर पोस्ट केल्याने तिला त्याबद्दलही प्रश्न करत आहेत.

आता रुबिना खरचं प्रेग्नट आहे की या फक्त अफवा आहेत हे तर लवकरच कळेल. मात्र ही अफवा काही नवी नाही या पुर्वीही बऱ्याचदा रुबिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर आल्या आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुबिनाने तिचा आणखी एक फोटो शेयर केला आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पोस्ट ना करो तो सवाल, करो तो बवाल'.

आता तिने असे का लिहिले आहे हे स्पष्टपणे सांगितले गेले नाही. त्यामुळे आता बातमीत किती सत्यता आहे हे रुबिना आणि तिचा पती अभिनवच सांगू शकतो.

रुबिना बद्दल बोलायचं झालं तर तिला 'छोटी बहू', 'शक्ती' या मालिकांमधुन प्रसिद्धी मिळाली. ती बिगबॉसची विजेती आहे. ती 'खतरों के खिलाडी' शोमध्येही दिसली आहे.रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT