Rubina Dilaik esakal
मनोरंजन

Rubina Dilaik: 'माझी काळजी करु नका', प्रेग्नंसीच्या बातम्यांवरुन रुबीना भडकली!

बिग बॉसची विजेती रुबीना दिलेक आता झलक दिखला जा मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rubina Dilaik tv entertainment actress news: बिग बॉसची विजेती रुबीना दिलेक आता झलक दिखला जा मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या रियॅलिटी शोमधून रुबीनानं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या सीझनमध्ये कोण विजेता होणार अशी चर्चा रंगली असताना रुबीना एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होताना दिसत आहे.

झलक दिखला जा मध्ये रुबीनाची मोठी हवा आहे. ती एका प्रेग्नंसी क्लिनिक बाहेर दिसून आली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे रुबीनाची गोड बातमी आहे की काय अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली. अशातच ती ट्रोल देखील होऊ लागली. यामुळे की काय रुबीनाला तिची बाजू मांडावी लागली. त्यात तिनं तिला ट्रोल करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. यावेळी रुबीना सोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील होता. त्या फोटोमुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये रुबीनाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून झलक दिखला जा रियॅलिटी शोमधून रुबीना नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या वेगवेगळ्या परफॉर्मन्सला चाहत्यांची मोठी दाद मिळताना दिसते. रूबीनानं दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ज्यांनी ट्रोल केले आहे त्यांना खडसावत आपल्या वैयक्तिक आय़ुष्यामध्ये लोकांना लक्ष घालण्याची काय गरज आहे असा प्रश्न केला आहे.

चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीची वक्तव्य करणं हे आता काही माझ्यासाठी नवीन नाही. लोकांनी विचार करुन बोलण्याची गरज आहे. मी प्रेग्नंट आहे की नाही याची काळजी लोकांनी करु नये. मी माझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. अशी प्रतिक्रिया रुबीनानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीची धाड

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT