ruchira jadhav reply to fan after she trolled for visit at lalbaugcha raja 2023 SAKAL
मनोरंजन

Lalbaugcha Raja: "बाकीच्या मंडळाचे देव पावतात नवसाला"; लालबागचा राजाच्या दर्शनाला गेली अन् फॅन्स नाराज, रुचिरा म्हणाली...

रुचिरा आणि एका नेटकऱ्याचा संवाद सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय

Devendra Jadhav

लालबागच्या राजाला सध्या अनेक गणेशभक्त ठिकठिकाणाहून गणपती दर्शनाला येत आहेत. लालबागच्या राजाचं मुखदर्शन आणि पददर्शन घेण्यासाठी असंख्य माणसं तासन् तास रांगेत उभं राहत आहेत.

अशातच मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलीय. रुचिराने सोशल मिडीयावर गणपती बाप्पासोबतचे खास फोटो शेअर केलेत. पण या फोटोखाली रुचिराच्या फॅन्सने नाराजीयुक्त कमेंट केल्यात. रुचिराने सुद्धा फॅन्सना सणसणीत उत्तर दिलंय. बघूया काय झालंय.

(ruchira jadhav reply to fan after she trolled for visit at lalbaugcha raja 2023)

फक्त लालबागचा राजा नवसाला पावत नाही तर...

रुचिराने लालबागच्या राजासोबतचे खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. या फोटोखाली एका नेटकऱ्याने केलेली कमेंट व्हायरल झालीय.

बाकीचे मंडळाचे पण पावतात देव बर का नवसाला, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय. त्यावर रुचिराने सुद्धा त्याला सणसणीत उत्तर दिलंय.

रुचिरा म्हणाली, "मी नवस करत नाही. मी बाप्पाला भेटायला जाते. आणि मुळात नेहमी काहीतरी मागण्यापेक्षा, जे दिलंय त्याबद्दल gratitude व्यक्त करायला आवडतं मला"

रुचिरा जाधव लालबागच्या राजाच्या चरणी लीन

रूचिरा आणि त्या नेटकऱ्याची कमेंट चांगलीच व्हायरल झालीय. रुचिरा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. रुचिराने लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.

रुचिराच्या या फोटोखाली तिच्या फॅन्सनी गणपती बाप्पा मोरया अशा कमेंट केल्यात. रुचिरा सध्या नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करत नसली तरीही तिच्या आगामी प्रोजेक्टची तिचे फॅन्स वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT