Rukhsar Rehman and Faruk Kabir Divorce  esakal
मनोरंजन

Rukhsar Rehman-Faruk Kabir Divorce : 'त्याला समजून घ्यायचं नसेल तर घटस्फोटच बरा'!

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुखसार रहमानच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rukhsar Rehman and Faruk Kabir Divorce : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुखसार रहमानच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिनं पती फारुख कबीरसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुखसार आणि फारुख चर्चेत आले आहेत.

तेरा वर्षांचा या सेलिब्रेटींचा संसार हा आता मोडला असून रुखसारनं सोशल मीडियावर देखील याविषयी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिनं फारुखविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. स्वताचा आणखी अपमान करुन घ्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वताच्या नजरेतून आणखी खजील व्हायचं नाही. असा विचार करुन रुखसारनं हा मोठा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

काही महिन्यांपासूनच रुखसार आणि फारुख कबीर यांच्यात काही आलबेल नाही. अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता थेट मोठी बातमीच रुखसारनं दिल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या नात्यांमध्ये घरच्यांनी देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निर्णयांवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीपासून रुखसा आणि फारुख हे वेगळे राहत आहेत. आता त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे.

ईटाईम्सनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं आहे की, रुखसारला आता संसारात काही रस नव्हता. तिचं आणि फारुखचं काही पटतही नव्हतं. त्यामुळे तिनं त्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. रुखसारनं यावर दिलेली प्रतिक्रियाही आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

रुखसार म्हणते की, हो हे खरं आहे की आम्ही वेगळे झालो आहोत. आणि आता घटस्फोटही घेणार आहोत. आम्ही सध्या त्याच प्रोसेसमध्ये आहोत. वकील यात आमची मदतही करत आहेत. त्यामुळे मी आता त्यावर आणखी काही बोलू इच्छित नाही. अशी प्रतिक्रिया रुखसारनं दिली आहे. यासगळ्यात रुखसारनं इंस्टावरुन जी पोस्ट केली आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT