rupali bhosale 
मनोरंजन

रुपाली भोसले अडकणार लग्नबंधनात? पोस्ट केला मंगळसूत्राचा फोटो

स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी' फेम आणि सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर रुपालीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. या चर्चेमागचं कारणही तसंच आहे. रुपालीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये चक्क मंगळसूत्राचा फोटो पोस्ट केला होता आणि 'अखेर.. हे घडतंय' असं कॅप्शन लिहिलं होतं. या फोटो आणि कॅप्शनमुळेच रुपाली लग्नबंधनात अडकतेय की काय, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे. रुपाली अंकित मगरे या चित्रपट निर्मात्याला डेट करतेय. अंकितसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर सतत शेअर करत असते आणि अनेकदा तिने मोकळेपणाने तिचं प्रेमसुद्धा व्यक्त केलं आहे. त्यामुळे अंकित आणि रुपाली लग्नाची तयारी करत असल्याची चर्चा सुरु झाली. 

सोशल मीडियावर पोस्ट केलेला मंगळसूत्राचा फोटो पाहून अनेक मित्रमैत्रिणींनीही रुपालीला फोन करण्यास सुरूवात केली. अखेर ती याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. "मी पोस्ट केलेला मंगळसूत्राचा फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालं. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, होय माझ्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. पण ते माझ्या लग्नाचे नसून माझा भाऊ संकेतच्या लग्नासाठी असेल. माझा भाऊ लग्नबंधनाच अडकण्यास सज्ज झाला असून त्यासाठी जोरदार शॉपिंग सुरू आहे. वहिनीसाठी नुकतीच आम्ही मंगळसूत्राची खरेदी केली आणि त्याचाच फोटो मी सोशल मीडियावर पोस्ट केला होता", असं रुपाली 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.  

भावाविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, "माझा भाऊ संकेत अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आला आहे. काही वर्षांपूर्वीच त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर तो भावनिक आणि मानसिकदृष्ट्या फार खचला होता. काम आणि भविष्याची चिंता त्याला सतावत होती. पण अखेर आता त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबीयांसाठी तो दिवस फार महत्त्वाचा आहे."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT