rupali bhosle
rupali bhosle sakal
मनोरंजन

संजनाने दिलाय एक खास संदेश, आज राग नाही अभिमान वाटेल..

नीलेश अडसूळ

'आई कुठे काय करते' ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनिरुद्ध देशमुख,अरुंधती आणि संजना या तिन त्रिकुटाचे अभिनय प्रक्षकांनी उचलून धरले आहे. य पात्रात संजना हे खलनायकी पात्र अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे. हे पात्र नकारात्मक असल्याने अनेकांना ते खटकते. प्रेक्षक संजना या पात्रावर टीकाही करतात पण हीच रुपालीच्या अभिनयाची पोचपावती आहे. त्यामुळे रुपालीचे काम पाहून तुम्हाला राग येत असेल पण आज तिचे सामाजिक भान पाहून अभिमान वाटेल.

रुपाली भोसले (rupali bhosle) हिने जागतिक वसुंधरा दिनी रसिक प्रेक्षकांना एक खास संदेश दिला आहे. यासाठी तिने एक खास व्हिडीओ चित्रित केला आहे. हा व्हिडीओ 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सेटवरील आहेत. ही मालिका आता पघराघरात पोहोचली आहे. त्यामुळे 'समृद्धी' निवास आणि त्यापुढील बाग हा आता आपल्याही आयुष्याचा भाग बनले आहेत. ही बाग केवळ एक चित्रीकरण स्थळ नसून मालिकेतील प्रत्येक कलाकार ही बाग फुलवण्यासाठी प्रयत्न करत असतो.

हा व्हिडीओ 'आई कुठे काय करते' च्या सेटवरील आहे. याठिकाणी सेटवरील कलाकार, स्पॉट बॉय आणि स्टाफमध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी बाग फुलवली आहे. याठिकाणी काही भाज्यांची देखील लागवड करण्यात आली आहे. एका मुलाखतीत संजना म्हणाली होती, ' ती या ठिकाणी उगवलेली भाजी अनेकदा घरी देखील घेऊन गेली आहे. 'आई कुठे काय करते'मधील समृद्धी बंगल्याशेजारीच ही लागवड करण्यात आली आहे. अनेकदा मालिकेतील ट्रॅकमध्ये जर स्वयंपाक घरात जेवण बनवतानाचा ट्रॅक असेल, किंवा किचनमध्ये एखादा सीन असेल तर त्यावेळी याठिकाणचीच भाजी वापरली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT