अभिनेता नाही आता 'गायक' अभिजीत खांडकेकर.. नवी भूमिका..

स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या भूमिकेत दिसणार आहे. नेमकी काय आहेत ही भूमिका.
abhijeet khandkekar
abhijeet khandkekar sakal

'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि लाखो तरुणींच्या हृदयात स्थान मिळवलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar) आता पुन्हा एका नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. आजवर अभियानासोबतच त्याची निवेदन शैलीही आपण पहिली. त्याने चित्रपटातूनही आपले अभिनय कौशल्य दाखवले. आता तो काहीशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यंदा चक्क हातात गिटार घेऊन तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

abhijeet khandkekar
बारसं झालं.. काय आहे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचं नाव..

स्टार प्रवाह या वाहिनीवर २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ (tuzech mi geet gaat ahe) ही मालिका सुरु होत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. एका गायकाच्या प्रेमात असणाऱ्या लहानग्या स्वराची ही कहाणी आहे. या प्रोमोतून चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायकाचे नाव मल्हार आहे आणि मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर याने साकारली आहे.

abhijeet khandkekar
Photo : वुलन टॉप मध्ये सोनाली दिसतेय लल्लन टॉप... पहा, सोनालीचे खास फोटो..

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे.'

पुढे तो म्हणतो, 'कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका प्रेक्षक प्रेमाने पहात आहेत आणि टीआरपीच्या रुपात भरभरुन प्रेम देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जाण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीय. याआधी मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या नव्या कलाकृतीला देखिल तेवढंच प्रेम मिळेल ही आशा आहे.’ अशी भावना अभिजीतने व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com