rupali bhosle shared emotional post about ravindra mahajani death  SAKAL
मनोरंजन

Ravindra Mahajani: बाबांनी त्यांचं पोस्टर डिझाईन केलं आणि मी... रुपाली भोसलेने सांगितली रविंद्र महाजनींची खास आठवण

रुपाली भोसले हिने रविंद्र महाजनींसोबतची खास आठवण शेअर केलीय.

Devendra Jadhav

Rupali Bhosle on Ravindra Mahajani News: आज शनिवारी सकाळी मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनींचं निधन झालं. रविंद्र यांनी आजवर अनेक सिनेमांमधून काम करत प्रेक्षकांची करमणुक केली.

अशातच आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भुमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिने रविंद्र महाजनींसोबतची खास आठवण शेअर केलीय.

(rupali bhosle shared emotional post about ravindra mahajani death )

रुपालीने रविंद्र यांच्यासोबतचा जीममधला फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत रुपाली लिहीते.. आम्ही एका जीममध्ये वर्कआऊट करायचो. याशिवाय मला काकांसोबत एका सिनेमात काम करायची संधी मिळाली. त्यांची जी स्टाईल होती ती त्यांनी तशीच ठेवली. मी त्यांना कधीही भेटले की हँडसम हंक म्हणायचे.

रुपाली पुढे लिहीते.. आईचा आवडता हिरो मुंबईचा फौजदार. हा त्यांचा सिनेमा.. सिनेमाच्या बॅनरच प्रिंट माझ्या वडिलांनी केलं होतं. त्यावेळी hand पेंटिंग होते. आणि पप्पा प्रिंटिंग लाईन मध्ये होते. कॉम्प्युटर येईपर्यंत पप्पा स्वतः डिझाईन वैगरे करायचे.

सो त्यावेळी त्यांनी ह्या सिनेमासाठी काम केलं होतं. पण कधी त्यांची भेट काकांसोबत झाली नाही. पण आपण म्हणतो आयुष्य आयुष्य हे एक सर्कल आहे तसंच झालं. आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. काका

अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. त्यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

कुठे घडली घटना?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

ते गेले ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

Winter Weather Severe : पुढील आठ दिवस हाडे गोठवणारी थंडी पडणार, वेधशाळेचा अंदाज; थंडीची लाट कायम

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

International Men's Day: अल्फा, बीटा की सिग्मा... पुरुषांनो तुम्ही कोणत्या पर्सनॅलिटी टाईपमध्ये मोडता?

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

SCROLL FOR NEXT