Rutuja Bagwe Instagram
मनोरंजन

'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश,तिच्यासोबत रोमान्स...'- ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवेनं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअरविषयी मनसोक्त संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं(Rutuja Bagwe) मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय. तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे. 'Respect'सिनेमाच्या निमित्तानं संवाद साधताना ऋतुजानं सकाळ पॉडकास्ट(Sakal Podcast) मुलाखतीत अनेक गोष्टींवर बेधडक वक्तव्य केली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं ''प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश होती म्हणूनच तिच्या सोबत रोमान्स करायला....'' पुढे काय म्हणाली आहे ऋतुजा बागवे यासाठी आपल्याला ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐकावी लागेल.(Ruja Bagwe says,'Prajakta Mali is my Lady Crush)

ऋतुजा बागवेची पॉडकास्ट मुलाखतीची लिंक बातमीत वर जोडलेली आहे.

ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळी(Prajakta Mali) सोबत काम केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता आणि ती एका कपलच्या भूमिकेत आहेत,जे समलिंगी आहे. प्राजक्ता ऋतुजाचं लेडी लव्ह आहे या सिनेमात.

ऋतुजा बागवेनं या पॉडकास्ट मुलाखतीत आपली पहिली ऑडिशन ते अनन्यासारख्या सुपरहिट नाटकापर्यंतचा प्रवास खुप छान पद्धतीनं मांडला आहे. अनन्या या गाजलेल्या नाटकात तब्बल दोन तास स्टेजवर हात बांधून वावरतानाचा उत्साह आणि नाटक संपल्यानंतर शरीराला होणाऱ्या वेदनेचा अनुभवही अगदी मार्मिक शब्दात सांगतिला आहे. ऋतुजा बागवेनं मुलाखतीच्या शेवटाला बोल्ड भूमिका करायला आवडतील जर...हे सांगताना व्यक्त केलेलं मत खूप बेधडक आहे. तेव्हा ऋतुजा बागवेची ही बिनधास्त-बेधडक मुलाखत या बातमीत जोडली आहे ती ऐकायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT